kadegaon news : कडेगाव पंचायत समितीची सूत्रे दोन डॉक्टरांकडे : सभापतीपदी डॉ.जितेश कदम तर उपसभापती डॉ.विजय महाडिक : नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणूकीत 8 पैकी 7 जागा जिंकून काँग्रेसने पंचायत समिती मध्ये जोरदार पुनरागमन केले होते. तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये काँग्रेस पक्षाने मारलेली मुसंडी ही कार्यकर्त्यांचा जोश वाढवणारी ठरली, त्यानंतर होत असलेल्या पदाधिकारी निवडीमध्ये
kadegaon news : कडेगाव पंचायत समितीची सूत्रे दोन डॉक्टरांकडे : सभापतीपदी डॉ.जितेश कदम तर उपसभापती डॉ.विजय महाडिक
सभापतीपदासाठी युवा नेते डॉ. जितेश हणमंतराव कदम तर उपसभापतीपदी डॉ. विजय भिमराव महाडिक यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे यानिवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या, यानिवडीमुळे तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
कडेगाव पंचायत समितीवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकला असून आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रभावी नेतृत्वाची तालुक्यातील जनतेने पुन्हा एकदा दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील संघटित नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे काँग्रेसला हे यश मिळाले असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
आमदार डॉ. विश्वजित कदम तसेच सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि बिनविरोध पार पडली आहे. स्व.आ.डॉ.पतंगराव कदम व माजी आमदार मोहनराव कदम यांच्या विचारांचा प्रभाव आजही किती खोलवर रुजला आहे, त्याचा प्रत्यय या निवडणूकीत आल्याचे पाहवयास मिळाले.
या निवडी मुळे कार्यकर्त्यांत आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कडेगावचे प्रांताधिकारी रणजीत भोसले यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, माजी आमदार मोहनराव कदम,
सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ.शांताराम कदम, माजी जि.प. सदस्या सौ.डॉ.वैशालीताई कदम, श्रीमती सुनिता कदम, सौ. मोनिका कदम, नूतन पंचायत समिती सदस्य दिग्विजय कदम, युवा नेते हर्षवर्धन कदम, सोनहीरा ऍग्रोचे आदित्य कदम, युवा नेते सुशांत कदम, माजी सभापती शोभा होनमाने, माजी उपसभापती विठ्ठल मुळीक, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा मालन मोहिते, पंचायत समिती सदस्य
पैलवान रणजीत पवार, सुप्रिया करांडे, भारती मिसाळ, राजकुंवर सूर्यवंशी, पूनम माळी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजोबांच्या वारशाचा तिसर्या पिढीकडे मानाचा मुकुट
माजी आमदार मोहनराव कदम यांनी 1972 ते 1997 दरम्यान देवराष्ट्रे जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व करत जिल्हा परिषद अध्यक्ष व 1991 मध्ये खानापूर पंचायत समितीचे सभापती म्हणून काम पाहिले. त्यांचा विकासाभिमुख वारसा पुढे नेत आता तिसर्या पिढीतील डॉ. जितेश कदम कडेगाव पंचायत समितीचे सभापती झाले आहेत. खमक्या युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











