ncp news : संजयकाका आणि निशिकांत पाटील यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर : सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचे वादळ उठले आहे. काही दिवसांपूर्वी शांत झाल्यासारखा भासणारा मतभेदांचा ज्वालामुखी आता पुन्हा उफाळून आला असून, जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजी उघडपणे समोर आली आहे.
ncp news : संजयकाका आणि निशिकांत पाटील यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर
या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकारणात नवे वळण निर्माण झाले असून, माजी खासदार संजयकाका पाटील आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यातील मतभेद आता उघडपणे चव्हाट्यावर आले आहेत.
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा यावरून मागील दहा दिवसांपासून पक्षातील नेत्यांमध्ये खळबळ माजली होती. वरकरणी हा वाद मिटल्याचे चित्र निर्माण करण्यात आले; मात्र गटनेत्याच्या निवडीनंतर पाठिंब्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आणि त्यातून अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत फूट स्पष्टपणे दिसू लागली.
संपूर्ण माहितीसाठी खालील व्हिडीओ पूर्ण पहा
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











