ncp news : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला व्हीपचा कायदा शिकवू नये, : सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेभोवतीचे राजकारण दिवसेंदिवस तापत चालले असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता स्पष्ट आणि ठाम भूमिका घेत राजकीय वातावरण अधिकच रंगतदार केले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला व्हीपचा कायदा शिकवू नये, असा ठणकावून इशारा देत माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.
ncp news : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला व्हीपचा कायदा शिकवू नये,
चार दशकांहून अधिक काळ राजकारणाच्या रणांगणात तावून-सुलाखून निघालेल्या या नेत्यांनी, आम्हाला राजकारणाचे धडे देण्याची गरज कोणालाही नाही, असा स्पष्ट संदेशच दिला.
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये सध्या व्यापक चर्चा आणि हालचाली सुरू आहेत. या सार्या घडामोडींमध्ये एक गोष्ट मात्र स्पष्टपणे समोर आली आहे-सत्तेचा निर्णय हा केवळ वरच्या पातळीवरून ठरणार नाही, तर जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र बसून सामुदायिक निर्णय घेतील. माजी आमदार विलासराव जगताप आणि अजितराव घोरपडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जिल्ह्यातील सर्व नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेबाबत एकमत आहे.
वरिष्टांकडून काही वेगळा निर्णय आला तरी आम्ही जिल्ह्यातील नेते एकत्र येऊन त्यावर अंतिम भूमिका ठरवू.
संपूर्ण माहिती खालील व्हिडिओ पूर्ण पहा
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











