sangli sp news : सातार्याचे एस.पी. तुषार दोशी यांची सांगलीला बदली : सातार्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्यामुळं वादात अडकलेले सातार्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे. गृह विभागानं पोलीस दलातील अधिकार्यांच्या बदल्यां जाहीर केल्या. पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे हे सातार्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील.
sangli sp news : सातार्याचे एस.पी. तुषार दोशी यांची सांगलीला बदली
तुषार दोशींवरुन विधिमंडळात रणकंदन
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी सातारा पोलिसांकडून सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. सातारा पोलीस अधीक्षक त्या वादामुळं चर्चेत आले होते. या वादानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी तुषार दोशींच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. त्यामुळं विधिमंडळात मोठा पेच निर्माण झाला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौर्यावर असताना मोठी घडामोड पाहायला मिळतेय. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी वेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोर्हे यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्तीच्या रजेवर पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांना काही दिवस पाठवल्यानंतर आज अचानक तुषार दोशी यांची बदली सांगलीला करण्यात आली आहे.
तुषार दोशी काही दिवस रजेवर गेले होते. रजेवरुन पुन्हा हजर झाल्यानंतर काही दिवसातचं तुषार दोशी यांची बदली झाली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी घडलेल्या प्रकारानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी तुषार दोशी यांच निलंबन करण्याचे आदेश सरकारला दिले होते.
तुषार दोशी पोलीस अधीक्षक, सातारा पदावरुन पोलीस अधीक्षक, सांगली पदावर बदली निखिल पिंगळे पोलीस उप आयुक्त, पुणे पदावरुन पोलीस अधीक्षक, सातारा पदावर बदली संदिप घुगे पोलीस अधीक्षक, सांगली येथून पोलीस उपआयुक्त, सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई पदावर बदली. योगेश गुप्ता पोलीस अधीक्षक, कोल्हापूर येथून पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र येथे बदली. निलोत्पल पोलीस अधीक्षक, गडचिरोली पदावरुन पोलीस अधीक्षक, कोल्हापूर येथे बदली.
एम. रमेश अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली पदावरुन पोलीस अधीक्षक, गडचिरोली पदावर बदली. महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, जळगाव पदावरुन पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे पदावर बदली श्रीकांत ढिवरे पोलीस अधीक्षक, धुळे पदावरुन पोलीस अधीक्षक, जळगाव पदावर बदली राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त, पुणे पदावरुन पोलीस अधीक्षक, वाशिम पदावर बदली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










