jainapur news : दहा हजार रुपयांच्या लाचप्रकरणी जैनापूरच्या सरपंचासह मुलावर गुन्हा दाखल

SHARE:

jainapur news : दहा हजार रुपयांच्या लाचप्रकरणी जैनापूरच्या सरपंचासह मुलावर गुन्हा दाखल : शेडनेटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला देण्याच्या बदल्यात 10 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जैनापूर (ता.शिरोळ) येथील सरपंच व त्यांच्या मुलावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. सरपंच तथा प्रशासक संगिता रमेश कांबळे (वय 52) आणि त्यांचा मुलगा निकेत रमेश कांबळे (वय 30, दोघे रा.जैनापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jainapur news : दहा हजार रुपयांच्या लाचप्रकरणी जैनापूरच्या सरपंचासह मुलावर गुन्हा दाखल

दरम्यान, मुलगा निकेत कांबळे याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. तर सरपंच कांबळे यांना रक्तदाब वाढल्याने त्यांना सांगली सिव्हील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे ‘ग्रीन नेट’ या नावाने शेडनेटचा व्यवसाय सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीत अर्ज केला होता. यावेळी सरपंच कांबळे यांनी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती.

त्यानुसार पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता, सरपंच कांबळे आणि त्यांचा मुलगा निकेत या दोघांनी 10 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 9 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

सरपंच आणि त्यांच्या मुलाने काम पूर्ण झाल्याशिवाय पैसे घेणार नाही, काम पूर्ण झाल्यावर पैसे द्या असे म्हणत पैसे घेण्यास नकार दिला. मात्र, पडताळणीमध्ये लाचेची मागणी सिद्ध झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई पथकात पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर, सुनील मोरे, सुधीर पाटील, संगीता गावडे आणि संदीप पवार यांच्या पथकाने केली आहे.

दरम्यान, 13 मे 2025 रोजी सरपंच कांबळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजुर झाल्याने त्यांचे सरपंच पद रद्द झाले होते. त्यानंतर घेण्यात आलेल्या सरपंच निवडीत विरोधी सदस्यांकडे अनुसूचित जाती महिला सदस्य नसल्याने पुन्हा त्या सरपंच बनल्या होत्या. तर सोमवारी त्यांच्यावर लाचेची मागणी करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *