shiroli news L शिरोलीत; तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक : हातकणंगले तालुक्यातील नामांकीत उच्च शिक्षण संस्थेत शिक्षण घेणार्या संशयित शाहीद समीर सनदे (रा. पुलाची शिरोली ता . हातकणंगले) याने त्याच्या बरोबर शिक्षण घेणार्या युवतीवर अत्याचार करून तिचे व्हिडीओ बनवून मित्रांना शेअर केल्याचा गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
shiroli news L शिरोलीत; तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
याबाबत अत्याचार झालेल्या युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक करून पेठवडगांव न्यायालयामध्ये हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर व्हिडीओ तयार करणारा त्याचा मित्र फरार असून त्याच्याकडे इतर आठ ते दहा युवतींचे व्हिडीओ असल्याचा संशय पोलिसांना असल्याने याप्रकरणी गोपनीयता बाळगली आहे.
अमरावती, नाशिक येथील प्रकरण गाजत असताना अशा प्रकरणाची पुनरावृत्ती हातकणंगले तालुक्यामध्ये घडली आहे. (शिरोली ता . हातकणंगले) येथील उच्च शिक्षण घेणार्या शाहीद सनदे या युवकाने जिल्ह्यातील चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या नगरीतील एका युवतीवर प्रेम होते. या युवतीच्या प्रेमाचा गैरफायदा घेत त्याने व त्याच्या समाजातील अभियंता असलेल्या एका संशयिताने या युवतीचे अश्लील व्हिडीओ तयार केले.
ते मित्राबरोबर शेअर केले. तसेच या युवतीच्या आठ ते दहा मैत्रिणीना गळाला लावलं असून त्याचे व्हिडीओ तयार केले आहेत. या प्रकरणांची माहिती अन्य कोणाला दिल्यास हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी संशयितांनी या आठ ते दहा युवतींना दिली असल्याचं तक्रारदार युवतीने पोलिसांना सांगितले आहे.अत्याचार झालेल्या युवतीच्या जवळचा मित्र असलेल्या एकाला याची कुणकुण लागली आणि त्याने याप्रकरणाला वाचा फोडली आहे.
या अत्याचाराची माहिती मिळताच संपूर्ण प्रकरणाचा स्फोट झाला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गोपनियता पाळली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने कायदा व सुव्यवस्या बिघडू नये यांची खबरदारी वरिष्ठांनी घेतली आहे. राजारामपूरी पोलीस ठाण्याकडून हे प्रकरण हातकणंगले पोलिसांकडे वर्ग केले आहे.
पीडित युवतीने तक्रार दाखल केल्यानंतर संशयित शाहीद सनदे याला राजारामपूरी पोलीसांनी ताब्यात घेवून हातकणंगले पोलिसांकडे वर्ग केले आहे. हातकणंगलेचे पोलीस निरिक्षक शरद मेमाणे यांनी त्याला पेठवडगांव न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
शिरोली बंद, संशयितासह साथीदारावर कारवाईची मागणी
शिरोलीतील शाहीद समीर सनदे याने अनेक तरुणीवर अत्याचार करुन त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केल्याचे स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून कबूली दिली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी शिरोली गाव बंद करण्याचा निर्णय घेतला. या नराधमाला आणि त्याचा साथीदार शाहरुख देईल याला कठोर कारवाई करावी याबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आणि बजरंग दलाच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आलं आहे.
शिरोली ग्रामपंचायत कागले गल्ली येथील शाहिद समीर सनदे याने अनेक तरुणींशी शारीरिक संबंध ठेवून त्याची व्हिडीओ चित्रीकरण करून मोबाईलमध्ये ठेवले होते. याबाबत हातकणंगले पोलिसांनी शाहिद याला अटक केली असून, त्याचा साथीदार शाहरुख हा फरार झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिरोलीमधील सकल हिंदू समाजाच्या वतीने माळवाडी महादेव मंदिर येथे बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी शिरोली गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पोलीस उपाधीक्षक सुरजीत सिंग चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड यांनी भेट दिली आणि तरुणांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आश्वासन दिले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि बजरंग दल यांच्यावतीने या घटनेच्या निषेधार्थ शिरोली पोलीस ठाण्याला निवेदन दिले असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. शिवप्रतिष्ठानच्यावतीने माजी जिल्हा परिषदेचे महेश चव्हाण, शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक सुरेश यादव, नितीन चव्हाण, तर सकल हिंदू समाजाच्या बैठकीला अर्जुन चौगुले, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, माजी उपसरपंच कृष्णात करपे, उपसरपंच विजय जाधव अविनाश कोळी राहुल अष्टेकर निलेश शिंदे योगेश खाडे यांच्यासह दोनशेहून अधिक सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुस्लिम समाजाच्यावतीने ही या घटनेचा निषेध केला असून त्यांनीही संबंधित आरोपींना कठोर कारवाई करावी अशी मागणी शिरोली पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










