jat murdar news : संखमध्ये वीज वितरण कंपनीच्या लिपिकाचा गोळ्या घालून खून

SHARE:

jat murdar news : संखमध्ये वीज वितरण कंपनीच्या लिपिकाचा गोळ्या घालून खून: जत तालुक्यातील संख येथे वीज वितरण कंपनीतील लिपीक संतोष शिवाप्पा बिरादार (वय 52) यांच्या खुनाचा तपास उमदी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत उघड केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

jat murdar news : संखमध्ये वीज वितरण कंपनीच्या लिपिकाचा गोळ्या घालून खून

दोन आरोपी तीन तासांत गजाआड, उमदी पोलिसांची जलद कारवाई;

10 मे रोजी मध्यरात्री 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारास संतोष बिरादार हे घराच्या पडवीत झोपलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन शेतातून पसार झाले होते.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन पथके तयार करून संशयितांचा शोध घेतला.

या कारवाईत रोहित ऊर्फ नागेश काळू जगदाळे (वय 22) याला संख-दरीबडची रस्त्यावरून तर मुख्य आरोपी महंतेश मल्प्पा स्वामी (वय 35) याला जाडरबोबलाद-माडग्याळ रस्त्यालगतच्या शेतातून अटक करण्यात आली. घटनेचे प्रत्यक्ष पुरावे नसतानाही पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि खबर्‍यांच्या मदतीने आरोपींना दुपारी 4.17 वाजेपर्यंत ताब्यात घेतले.

या कारवाईत फौजदार बंडू साळुंखे, दिनेश घसाडे तसेच उमदी पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. या जलद तपासामुळे परिसरात उमदी पोलिसांचे कौतुक होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *