arag crime news : आरगमध्ये औषध फवारणी करताना मामा-भाचाला शॉक लागून दुर्दैवी अंत : मिरज तालुक्यातील आरग येथे वांग्याच्या शेतात औषध फवारणी करत असताना विजेचा शॉक लागून मामा विशाल पांडुरंग माळी (वय 26 रा.आडवा रस्ता बोलवाड) व भाचा अथर्व रविंद्र माळी (वय 15 रा. आरग ता.मिरज) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
arag crime news : आरगमध्ये औषध फवारणी करताना मामा-भाचाला शॉक लागून दुर्दैवी अंत
या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मामा-भाच्याचा असा मृत्यू झाल्याने ग्रामीण भागात एकच हळहळ व्यक्त होत होती. मामा आणि भाच्याचे एकमेकांवर अतिशय जीव होता. शेवटीही जाताना दोघांचा एकत्रीत दुर्दैैवी अंत झाल्याने परिसरात ग्रामस्थ अतिशय दु:ख व्यक्त करताना दिसत होते.
विशाल माळी यांच्या पश्चात त्यांच्या आई व वृद्ध आजोबा आहेत. अथर्व माळी हा मयत विशाल माळी यांच्या बहिणीचा एकुलता मुलगा होता. विशाल माळी यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले आहे. तर अथर्व माळी यांच्या वडिलांचेही दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मयत विशाल माळी व अथर्व माळी हे दोन्ही कुटुंबांचे आधार होते.
दोघा मामा-भाच्यांचे एकमेकांवर अतोनाथ प्रेम होते. हेच प्रेम नियतीला मान्य नव्हते की काय? या मामा-भाच्यांचा वीजेचा शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला. दोघे मिळून शेती करून दोन्ही कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होते. दोन्ही कुटुंबांचा आधार हरपला आहे. दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विशाल आणि भाचा अर्थव हे दोघेही शेतीची कामे करीत होते. दोघेही कुटूंबियाचा आधार होते. शेतात काम करीत असताना अथर्व हा मामाला नेहमीच मामा शेतात काम काय कराचं ते सांग मी करतो. असे सांगितल्यानंतर मामा विशाल हा अरे मी आहे की तु काही चिंता करू नकोस आम्ही दोघेही व्यवस्थित शेती करू . शेतात वांगी आहेत त्याला दरही चांगला मिळेल या आशेने वांग्याची शेती चांगली केली होती.
दोघांचे एकमेकांवर असलेल्या प्रेमाबद्दल ग्रामस्थांमधून आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. दोघेही दुपारच्या सुमारास आरग परिसरातील माळी वस्ती येथील अथर्व यांच्या वांग्याच्या शेतामध्ये मामा विशाल माळी व भाचा अथर्व माळी हे दोघे औषध फवारणी करण्यासाठी गेले होते. वांग्याच्या शेतामध्ये औषध फवारणी करण्यासाठी माळी यांच्याकडे एचटीपी यंत्र आहे.
दोन दिवसापूर्वी पाऊस झाल्याने वांगी पिकांवर औषध फवारणी करणेसाठी दोघे गेले होते. शेतात अजून घात आली नव्हती. येथे वांग्याच्या शेताशेजारी विजेचा ट्रांसफार्मर होता. त्याचा विद्युत प्रवाह एचटीपी यंत्रामध्ये विद्युत प्रवाह उतरला होता.
एचटीपी यंत्राला सुरू करण्यासाठी म्हणून विशाल माळी व अथर्व माळी हे दोघे गेले असता दोघांना शॉक लागल्याने दोघही जागीच कोसळे. वीजेचा प्रवाह सुरू होता. विजेचा शॉक लागल्यानंतर विशाल माळी व अथर्व माळी या दोघांचा शेतामध्येच जागेवरच मृत्यू झाला.
विशाल माळी यांची बहीण व भाचा आरग येथे राहण्यास आहेत. या ठिकाणी त्यांची शेती आहे. भाचा वयाने लहान असल्याने मामा विशाल माळी हे त्याला शेतीमध्ये मदत करीत होते. ते बोलवाड येथून आरगेला जाऊन भाच्यासोबत शेतीमध्ये काम करीत होते.
या घटनेची माहिती मिळाताच ग्रामस्थ व नातेवाईकांच्या माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अथर्व माळी यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस तसेच वीज वितरण अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










