sangli-satara election news : सांगली-सातारा विधानपरिषदेसाठी 853 मतदार : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक 18 जूनला होत आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही जिल्ह्यात 853 मतदार असून सांगलीत 415 व सातारा जिल्ह्यातील 438 मतदारांचा समावेश आहे. 2016 च्या तुलनेत 283 मते वाढली आहेत. विधानपरिषदेसाठी आठ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
sangli-satara election news : सांगली-सातारा विधानपरिषदेसाठी 853 मतदार
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेल्या विधानपरिषदेच्या 16 जागा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. त्यामध्ये सांगली-सातारा विधानपरिषदेचा समावेश आहे. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत सांगली-सातारा जिल्ह्यात 570 मतदार होते. गेल्या काही वर्षात नगरपंचायत आणि थेट नगराध्यक्ष यांच्या निवडीने जागा वाढल्या आहेत. या निवडणुकीसाठी दोन्ही जिल्ह्यात 853 मतदारांचा समावेश आहे. यंदा 283 मतदार वाढले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत संबंधित मतदारसंघातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापतींना मतदान करता येईल. गतवेळी झालेल्या निवडणुकीत सांगली आणि सातारा जिल्ह्यात प्रत्येक चार मतदान केंद्र होते. यंदाही तितकेच केंद्र राहतील. सांगली जिल्ह्यात विटा, ईश्वरपूर, सांगली आणि जत तर सातारा जिल्ह्यात वाई, फलटण, कराड आणि सातारा येथे मतदान केंद्र राहिल.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्यांना मदत करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सांगली आणि निवासी उपजिल्हाधिकारी सातारा हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
विधानपरिषदेची मतदार संख्या
जिल्हा मतदार संख्या
सातारा 438
सांगली 415
एकूण 853
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










