mouje digraj news : सांगलीत भरधाव डंपरच्या धडकेत मौजे डिग्रज येथील वृद्ध ठार : शहरातील जुना बुधगाव रोडवरील ईदगाह मैदान जवळ भरधाव डंपरने दुचाकीवरून निघालेल्या वृद्धाला जोराची धडक दिली. या अपघातात पायावरून डंपर गेल्याने गंभीर जखमी झालेल्या अप्पासाहेब अण्णा मगदूम (वय 66 रा. मौजे डिग्रज) यांचा जागीच मृत्यू झाला.
mouje digraj news : सांगलीत भरधाव डंपरच्या धडकेत मौजे डिग्रज येथील वृद्ध ठार
सदरचा अपघात हा शुक्रवार दि. 22 मे रोजी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी राहुल आप्पासो मगदूम यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत अप्पासाहेब मगदूम हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज गावामध्ये राहत होते. फिर्यादी राहुल यांचे वडिल आप्पासाहेब मगदूम हे शुक्रवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरुन (क्र. एमएच 10 डीजे 9369) जुन्या बुधगाव रोडवरील बायपास रस्त्याकडे निघाले होते. म्हसोबा मंदिरानजीक ते आले असता पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या डंपरने (क्र. एमएच 10 डीटी 8529) त्यांना धडक दिली.
यानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राहुल मगदूम यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी डंपरचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










