idris naikwadi news : मी राजीनामा देणार नाही, सुनेत्रा पवारांचे ओएसडी आले होते पण… राज्यपालनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रीस नायकवाडी यांच्या राजीनाम्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. नायकवाडी यांना पक्षाकडून राजीनामा देण्यास सांगितल्याचं बोललं जात आहे. मात्र, मला पक्षाकडून किंवा कुठल्याही नेत्याकडून तसं सांगण्यात आलं नाही. तरीही उद्या पक्षाच्या बैठकीत मी याबाबत चर्चा करेल असे स्पष्टीकरण आमदार इद्रीस नायकवाडी यांनी दिले.
idris naikwadi news : मी राजीनामा देणार नाही, सुनेत्रा पवारांचे ओएसडी आले होते पण…
इद्रिस नायकवडींच्या राजीनाम्याची चर्चा अन् इन्कार
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार असताना मध्येच राजीनामा द्यावा लागेल, अशा कधी चर्चाही झाल्या नव्हत्या. मला आमदारकी देताना त्यांनी सांगितलं होतं, ही संधी एकदाच आहे. आता, विधानसभेच्या तयारीला तुम्ही लागा, कारण भविष्यात विधानसभा लढवायची आहे, असेही नायकवाडी यांनी सांगितले.
इद्रिस नायकवडी यांनी या गोष्टीचा इन्कार केला असून, राजीनामा देणार नसल्याचे सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, पक्षाकडून मला अद्याप राजीनाम्याबाबत सांगितलेलं नाही, प्रत्येक पक्षात असे काही लोक असतात जे अशा प्रकारे चर्चा करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या बैठक आहे. मी नक्कीच या चर्चांबाबत बोलेल, असे म्हणत आपण राजीनामा देणार नसल्याचे इद्रीस नायकवाडी यांनी म्हटले.
तसेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ओएसडी माझ्याकडे आले होते. माझा हात फ्रॅक्चर झाला होता, तेव्हा कोल्हापूर भागात ते होते म्हणून भेटायला आले होते, असे स्पष्टीकरणही नायकवाडी यांनी दिले.
चौकट
महापौरपदाचा राजीनामाही मागितला होता.
इद्रिस नायकवडी म्हणाले, महापौर असताना राजीनामा मागण्याबाबत एक प्रसंग घडला होता. सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेचा महापौर असताना मला राजीनामा देण्यासाठी दबाव आणला होता त्यावेळी नेतृत्वाला मी राजीनामा देणार नाही हे स्पष्ट केलं होतं. मुळात त्यावेळी मी स्थानिक आघाडी करून 48 नगरसेवक निवडून आणले होते आणि महापौर झालो होतो त्यामुळे राजीनामा देणार नसल्याचं सांगितल होतं.
अजित पवारांमुळे आमदारकीची संधी
इद्रीस नायकवडी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांनी अल्पसंख्यांक चेहरा म्हणून इद्रीस नायकवाडी यांना विधानपरिषद आमदारकीची संधी दिली होती. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर आता पक्षातील नेतृत्वाकडून त्यांना राजीनामा मागितला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्वीय सहायक इद्रीस नायकवाडी यांना भेटल्याचे कळते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










