diliptatya news : दिलीपतात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची जय्यत तयारी

SHARE:

diliptatya news : दिलीपतात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची जय्यत तयारी : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवारी होणार्‍या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रानिमित्त त्यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

diliptatya news : दिलीपतात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची जय्यत तयारी

खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांच्या हस्ते चरित्र ग्रंथाचे प्रकाशन होणार

खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांच्या हस्ते व माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन सोहळा आज बुधवारी दि.26 ऑगस्टला दुपारी 3 वाजता, राजारामबापू नाट्यगृहात होत आहे. इंद्रप्रस्थ नागरी सह.पतसंस्थेचे अध्यक्ष व नगरसेवक संग्रामसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दिलीपतात्या हे दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळणारे रोखठोक व निष्ठावंत व्यक्तिमत्व आहे. आजपर्यंत त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. वयाच्या अवघ्या 19 वर्षी कारखान्याचे संचालक म्हणून कामाला सुरूवात केली. सहकार, राजकारण, सामाजिक काम, संस्थात्मक उभारणी, चित्रपट निर्मिती अशा एक ना अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम करून आपला ठसा उमटविला आहे. त्यामुळे अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा कार्यक्रम बहारदार व्हावा यासाठी सत्कार समिती गेल्या 15 दिवसांपासून झटत आहे.

राजारामबापू पाटील नाटयगृहाच्या समोर स्वागत कमान उभारण्यात आली आहे. नाटयगृहाच्या आवारात मंडपही घालण्यात आला आहे. त्याठिकाणी मोठया पडदयावर आतील कार्यक्रम पाहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री आ.जितेंद्र आव्हाड, सांगली लोकसभा मतदार संघाचे खा.विशाल पाटील, हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे माजी खा.राजू शेट्टी, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार व माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री आ.विश्वजीत कदम, आ.रोहीत आर.आर.पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवीजीराव नाईक, माजी आ.मानसिंगराव नाईक, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आ.विक्रम सावंत, विलासराव जगताप, मोहनराव कदम तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.संगीता पाटील, राजारामबापू कारखान्याचे चेअरमन प्रतिक जयंतराव पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, राज्य सहकारी दूध संघाचे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील, राजारामबापू बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव याबरोबरच सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि तात्यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.दिलीपराव पाटील (तात्या) सत्कार समिती व इंद्रप्रस्थ नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अधिक चव्हाण, संचालक कांतीप्रसाद दिलीपराव पाटील, व्यवस्थापक राजाराम कटारे, महावीर व्होरे, प्रमोद कदम हे परिश्रम घेत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *