pune padvidhar news : भाजपकडून काँग्रेसवर ‘नेम’ आणि शरद लाड यांचा ‘गेम’

SHARE:

pune padvidhar news : भाजपकडून काँग्रेसवर ‘नेम’ आणि शरद लाड यांचा ‘गेम’: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांची उमेदवारी निश्चित असताना भाजपने राजकीय डाव टाकत काँग्रेसचे बडे नेते, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सख्या भाचीला भाजपकडून पदवीधरची उमेदवारी दिली. पण एक वर्षांपूर्वी भाजपवाशी झालेले आणि गेल्या दोन वर्षांपासून पदवीधर मतदारसंघाची तयारी करत असलेले शरद लाड यांचा ‘गेम’ झाला असल्याचे बोलले जात आहे. यामुळे लाड प्रेमी नाराज झाले असून सांगली जिल्ह्याची प्रचंड निराशा झाली आहे.

pune padvidhar news : भाजपकडून काँग्रेसवर ‘नेम’ आणि शरद लाड यांचा ‘गेम’

लाड यांना डावलल्याने सांगली जिल्ह्याची निराशा

पुणे पदवीधर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. पण हाबालेकिल्ला जिल्ह्यातील मातब्बरांनी उलथवून टाकल्याचे काम अनेकवेळा केले गेले आहे. 2020 च्या पुणे पदवीधर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे अरूणअण्णा लाड यांनी केला होता. गेल्या सहा वर्षात त्यांनी पदवीधारांचे विविध प्रश्न मांडण्याचे व सोडविण्याचे काम केले होते. 2026 च्या पदवीधर निवडणुकीत त्यांचे पुत्र शरद लाड हे तयारी करत होते.

सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यात त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून संपर्क सुरू केला होता. एक वर्षांपूर्वी शरद लाड यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद लाड यांना पदवीधरची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले असल्याचे लाड समर्थक बोलत होते.

कुंडलचे लाड घराणे डाव्या विचारसरणीचे आहे. शरद लाड यांचे आजोबा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जी. डी. बापू लाड यांनी आयुष्य जातीयवादी पक्षाच्या विरोधात घालवले. डाव्या विचारसरणीच्या पक्षाच्या उभारणीसाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले. त्यांच्याच नातवंडाने केवळ आमदारकीसाठी त्यांच्या विचारांना तिलांजली देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला,

ही बाबच त्यावेळी अनेकांना खटकली होती. तरी देखील शरद लाड यांनी भाजपचे काम सुरू ठेवले होते. गेले वर्षभर शरद लाड यांनी पुणे पदवीधर मतदारसंघात जोरदार तयारी चालवली होती. अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तसेच मतदारांच्या गाठीभेटी ते घेत होते. यावेळी शंभर टक्के उमेदवारी तुम्हालाच असे स्पष्ट आश्वासन अगदी काल परवापर्यंत भाजपाचे नेते मंडळी त्यांना देत होती.

भाजपकडून पदवीधरची उमेदवारी मिळेल आणि आमदारकीचे स्वप्न साकार होईल, अशी आशा लाडप्रेमींना देखील होती. परंतू भारतीय जनता पक्षाने शरद लाड यांचा गेम केला. स्मिता जाधव यांचा भाजपशी संबंध नसताना देखील त्यांना भाजपची उमेदवारी जाहीर करण्यात आली. स्मिता जाधव या काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या भाची आहेत.

जाधव यांना उमेदवारी दिल्याने आ. बंटी पाटील यांची तलावर मान्य करण्याचा उद्देश भाजपचा आहे. शिवाय त्या पिंपरी-चिंचवड येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या त्या प्र-कुलगुरू आहेत. त्यामुळे आ. सतेज पाटील यांची असलेली शिक्षण संस्थेचा भाजपला फायदा होईल, असे गणित घातले जात आहे.

पण यामध्ये भाजपने शरद लाड यांचा गेम केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपविरोधात लाडप्रेमींमध्ये संतप्त लाड उसळली आहे. त्यामुळे भाजपच्यान नेत्यांनी काँग्रेसवर नेम धरून शरद लाड यांची गेम केली आहे. भाजपने जिल्ह्यातील अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी अमिषे दाखवून भारतीय जनता पक्षात घेण्याचा सपाटा लावला होता.

अनेक जण बळीचे बकरे झाले, त्यामध्ये आता शरद लाड यांचे देखील नाव घेतले जात आहे. यामागचे भाजपकडून वेगळे राजकारण खेळले जात आहे. पदवीधर निवडणुकीत देखील हाच प्रकार झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नाराजीचे काय परिणाम होणार? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *