karnatak news : कारागृहातील प्रेमीयुगुल विवाहबंधनात अडकणार, कर्नाटक उच्च न्यायालयाची संमती

SHARE:

karnatak news : कारागृहातील प्रेमीयुगुल विवाहबंधनात अडकणार, कर्नाटक उच्च न्यायालयाची संमती : खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मुडलगी (जि. बेळगावी) तालुक्यातील प्रेमी युगुलाला विवाहबंधनात अडकण्याची संधी मिळाली आहे. या दोघांनी लग्नासाठी केलेला अर्ज मंजूर करत, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने त्यांना लग्नासाठी एका दिवसाचा ’पॅरोल’ (तात्पुरता जामीन) मंजूर केला आहे. यामुळे सकाळी लग्नाच्या बेडीत आणि सायंकाळी पुन्हा कारागृहाच्या कोठडीत असा हा आगळावेगळा विवाह पार पडणार आहे.

karnatak news : कारागृहातील प्रेमीयुगुल विवाहबंधनात अडकणार, कर्नाटक उच्च न्यायालयाची संमती

17 जुलै 2023 रोजी वडेरहट्टी (ता. मुडलगी) येथील बनसिद्धेश्वर मंदिराच्या आवारात शंकर सिद्दप्पा जगमुत्ती (वय 28) याचा खून झाला होता. या खून प्रकरणात शंकरची पत्नी सिद्दव्वा उर्फ प्रियांका (वय 21) आणि तिचा प्रियकर श्रीधर अर्जुन तळवार (वय 21, रा. बैरनट्टी, ता. मुडलगी) या दोघांना अटक झाली. खटल्याच्या सुनावणीत आरोपी सिद्धव्वा ऊर्फ प्रियांका आणि श्रीधर यांना न्यायाधीशांनी दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. सध्या हे दोघे आरोपी बेळगावी मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

कारागृहात शिक्षा भोगत असताना प्रियांका आणि श्रीधर या दोघांनी एकमेकांशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज सादर केला. लग्नाची तयारी आणि विवाहासाठी 90 दिवसांच्या पॅरोलची मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयातील खंडपीठाने 90 दिवसांच्या पॅरोलची मागणी फेटाळून लावत त्यांना लग्नासाठी केवळ एका दिवसाचा पॅरोल मंजूर केला आहे.

पोलिसांच्या बंदोबस्तात पार पडणार लग्न

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत पोलिसांच्या कडक बंदोबस्तात या दोघांचा विवाह सोहळा पार पडेल. विवाह झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी त्यांना पुन्हा बेळगाव कारागृहात हजर व्हावे लागणार आहे.

आरोपींच्या लग्नाबाबत उत्सुकता

संबंधित अधिकार्‍यांनी एका आठवड्याच्या आत लग्नाची तारीख निश्चित करावी, असे स्पष्ट निर्देशही उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. या आदेशामुळे जन्मठेप भोगणार्‍या कैद्यांचे लग्न नेमके कधी आणि कसे पार पडणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *