पिंपरी खुर्दचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

SHARE:

 सात – बारा नोंदीसाठी २ हजाराची लाच : साथीदारही ताब्यात.
बक्षीसपत्र जमिनीच्या सात-बारा सदरी नोंद करण्यासाठी २ हजारच्या लाच घेणाऱ्या तलाठ्यासह त्याच्या साथीदारास रंगेहात पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुचपत विभागाने आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे सदरची कारवाई केली. तलाठी सुधाकर कृष्णा कुंभार (वय ५५, रा. कुंभार मळा, उंटवाडी रोड, मेंढेंगिरी, ता. जत ) आणि त्याचा साथीदार बाळासो बापुराव पाटील (वय ४२, रा. पाटील मळा, पांढरेवाडी रस्ता, आटपाडी) या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

(SANGLI ) पिंपरी खुर्दचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्या वडिलांनी त्यांच्या आईच्या नावे असलेली आटपाडी तालुक्यातील बोबेंवाडी येथील जमिन बक्षीसपात्र करुन दिली होती. त्याची ७ / १२ सदरी नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी सुधाकर कुंभार याच्याशी संपर्क साधला. मात्र तलाठी कुंभार याने नोंदीसाठी २ हजारची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदार यांनी दि. २९ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
रक्कम त्याचा साथीदार बाळासो पाटील याच्याकडे देण्यास सांगितले.
तक्रारीची शहनिशा करुन पथकाने आटपाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सापळा लावला. त्यावेळी तलाठी सुधाकर कुंभार याने तक्रारदार यांच्याकडे २ हजारची लाचेची मागणी करुन ती रक्कम त्याचा साथीदार बाळासो पाटील याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर तलाठी सुधाकर कुंभार याने ती लाच स्विकारली.
यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.
दोघांवर आटपाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपअधिक्षक संदिप पाटील, पोलीस निरिक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे,  पोलीस कर्मचारी अजित पाटील, सलीम मकानदार, पोपट पाटील आदीनी सहभाग घेतला.

लाख रूपये खंडणीसाठी तरूणाचे अपहरण
मिरज रोडवर रिक्षाच्या धडकेत सायकलस्वार ठार
धाक दाखवून लुटणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

वाळव्यात पाणीपट्टी घेतली म्हणून कर्मचाऱ्यास मारहाण
वाळवा येथील किसान नं. 2 सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्या.वाळवाचे कर्मचारी प्रकाश आनंदराव भोसले वय 47 रा.आहिरवाडी यांना पाणीपट्टीची रक्कम का कापून घेतली याचा जाब विचारत आरोपी प्रशांत उर्फ बटू भीमराव आहिर रा.मोहितेमळा, वाळवा याने शिवीगाळ करीत,लाकडी काठीने व हाताने मारहाण करीत धमकी दिली. याबाबत जखमी कर्मचारी प्रकाश आनंदराव भोसले  यांनी आष्टा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध फिर्याद दिली आहे.
   याबाबत आष्टा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,
दि.28 डिसेंबर रोजी तीन   वाजणेच्या सुमारास वाळवा येथील हुतात्मा स्मारक समोर किसान नं. 2 सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्या.वाळवा च्या ऑफिसमध्ये कर्मचारी प्रकाश आनंदराव भोसले हे काम करीत बसले होते. यावेळी आरोपी प्रशांत उर्फ बटू भीमराव आहिर हा तेथे आला.
तुम्ही माझी पाणीपट्टीची रक्कम का कापून घेतली याचा जाब
विचारत त्याने प्रकाश भोसले यांना शिवीगाळ करत तेथे असणाऱ्या लाकडी काठीने त्यांच्या पोटावर डाव्या बाजूस, डाव्या हाताच्या कोपरावर व डोक्यात मारहाण केली. नंतर हाताने त्यांच्या दोन्ही गालावर चापटी मारत तुला ठेवत नाही अशी धमकी दिली. नंतर त्यांचा शर्टचा गचुटा धरून त्यांना ऑफिसमधून बाहेर आणले व तेथून निघून गेला. याबाबत अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *