arag accident news : आरगेत ट्रॅक्टरच्या धडकेत बस ओढ्यात कोसळली; 40 प्रवासी जखमी : मिरज आगाराची एक बस (एमएच 14 बीटी 36 90) आणि ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरमध्ये आज दुपारी आरग शिंदेवाडी रोडवर भीषण अपघात झाला. शिंदेवाडी येथील ओढा पात्राजवळ ही धडक इतकी जोरदार होती की, बस थेट ओढा पात्रात कोसळली.
arag accident news : आरगेत ट्रॅक्टरच्या धडकेत बस ओढ्यात कोसळली; 40 प्रवासी जखमी
या अपघातात बसमधील शालेय विद्यार्थी आणि प्रवासी असे सुमारे 40 ते 45 जण जखमी झाले असून, बसचालक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
मिरज आगाराची ही बस मिरज-मधभावी या मार्गावरून जात असताना, आरग शिंदेवाडी रोडवरील ओढा पात्रा नजीक समोरून येणार्या ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरला तिने समोरासमोर धडक दिली. धडकेनंतर बस ओढ्यात कोसळली.
अपघाताच्या वेळी बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह 40 ते 45 प्रवासी होते. या सर्वांना कमी-अधिक प्रमाणात दुखापती झाल्या आहेत. बसचालकाला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे. तातडीने सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि एसटी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी तातडीने पंचनामा करून अधिक तपास चालू केला आहे .
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











