ashta crime news : आष्ट्यात ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार एकजण गंभीर

SHARE:

ashta crime news : आष्ट्यात ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार एकजण गंभीर : आष्टा ता. वाळवा येथे ट्रॅक्टरने दुचाकीस दिलेल्या धडकेत ट्रॅक्टरच्यामागे उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली सापडून महिला जागीच ठार झाली. तर 16 वर्षीय दुचाकी चालक गंभीर जखमी झाला.

ashta crime news : आष्ट्यात ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार एकजण गंभीर

बुधवार 6 मे रोजी मटण मार्केट ते मिरजवेस रोड आष्टा येथे सकाळी साडे दहा वाजणेच्या सुमारास हा अपघात घडला. अनिता सुभाष माळी वय 50 रा.चौमोट मळा, आष्टा असे मयत महिलेचे नाव असून वरद संतोष माळी वय 16 असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. मयत अनिता माळी यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन रक्ताचा सडा साचला होता.

घटनास्थळ व आष्टा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार 6 मे रोजी मटण मार्केट ते मिरजवेस रोड येथे सकाळी साडे दहा वाजणेच्या सुमारास आरोपी ट्रॅक्टर चालक अर्जुन शामराव खोत वय 40 रा. कुंभोज ता. हातकणंगले जि.कोल्हापूर हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा ट्रॅक्टर क्र.एम.एच.09 बी.पी.1783 त्याच्या मागे ऊस भरलेली ट्रॉली क्र.एम.एच.09 एफ.जे.3817 घेऊन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने चालवत वरद माळी चालवत असलेल्या एच एफ डिलक्स दुचाकी क्र.एम. एच. 10 इ. टी.3224 ला उजव्या बाजूस धडक दिली.

यात दुचाकी पडून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे मागील उजव्या बाजूचे चाक मागे बसलेल्या अनिता माळी यांच्या डोकीवरून गेले. यात त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या उडाल्या व त्या जागेवरच मयत झाल्या. तर दुचाकी चालक वरद माळी जखमी झाला. ट्रॅक्टर चालक अर्जुन खोत याच्या विरुद्ध विजय अशोक माळी यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.
मयत अनिता माळी यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *