jat murdar news : न्यायालयात साक्ष देण्यासाठी चाललेल्या तरूणाचे अपहरण करून खून : सांगली येथील न्यायालयात साक्ष देण्यासाठी मोटरसायकल वरून निघालेल्या व कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाट्यावरून अपहरण झालेल्या कोसारी येथील दादासो यमगर यांचा कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील मदभावी गावच्या हद्दीत खून झाल्याचे बुधवारी आकरा वाजता उघडकीस आले. आहे.जत तालुक्यातील कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणातील साक्षीदाराची हत्या झाली आहे.
jat murdar news : न्यायालयात साक्ष देण्यासाठी चाललेल्या तरूणाचे अपहरण करून खून
जत तालुक्यातील कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणातील होता साक्षीदार
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात नागज फाट्यावरून जत तालुक्यातील कोसारी येथील दादासो यमगर यांचे अपहरण करून त्यांची निर्घृणपणे कर्नाटकातील अथणी तालुक्यातील मदभावी गावात हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. जत तालुक्यातील कोसारी गावातील दुहेरी खून प्रकरणी मंगळवारी सांगली येथील न्यायालयात साक्ष देण्यासाठी निघालेल्या दादासो यमगर यांची हत्या झाल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या खून प्रकरणातील काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
जत तालुक्यातील कोसारी गावामध्ये 2023 सालामध्ये विहिरीतील गाळ काढण्याच्या वादातून विलास यमगर व प्रशांत यमगर यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी खुनाच्या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली होती.आरोपी अद्याप कारागृहात आहेत. या दुहेरी खून प्रकरणाची सांगली येथील न्यायालयात सुनावणी होती. या प्रकरणात फिर्यादी प्रवीण यमगर व खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासो यमगर आपल्या मोटरसायकल वरून नागज मार्गे सांगलीला निघाले होते.
यावेळी कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथील फाट्यावरून काही अज्ञात व्यक्तींनी दादासो यमगर यांचे अपहरण मंगळवारी करण्यात आले होते. कोसारी दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासाहेब यमगर यांचे अपहरण झाल्याची माहिती समजतात सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.
अपहृत साक्षीदार दादासो यमगर यांचा कसून शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी राबविलेला होता. बुधवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील अथणी पोलिसांना एका अज्ञात इसमाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. अथणी पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती प्राप्त करून सांगली पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर अपहरण झालेल्या दादासो यमगर यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी कर्नाटकातील अथणी तालुक्यातील मदभावी गावात ज्या ठिकाणी खुनाची घटना घडलेली होती. त्या ठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी दादासो यमगर यांच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले होते मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. दादासो यमगर यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ओळखला असून नातेवाईकांनी घटनास्थळी मोठा आक्रोश केला. आम्हाला न्याय द्या अशी मागणी नातेवाईकांनी पोलिसांच्याकडे केली.
घटनास्थळावरून पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून, घटनास्थळाचा पंचनामा करून दादासो यमगर यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता. पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे हे स्वतः आपल्या पथकासह मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झालेली नसली तरी अपहरणाच्या गुन्ह्यात वाढ होऊन खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










