ankali crime news : अंकलीत भल्या पहाटे महिलेच्या गळ्यातील सोने हिसडा मारून केले लंपास : मिरज तालुक्यातील अंकली मध्ये भल्या पहाटे झालेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेनं खळबळ उडाली. सकाळच्या सुमारास चालत फिरायला निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील 50 हजार रुपयांचे गंठन चोरट्याने हिसडा मारून दुचाकीवरुन पलायन केले. ही घटना मंगळवारी सकाळी 6 च्या सुमारास अंकली रेल्वे पुलानजीक घडली.
ankali crime news : अंकलीत भल्या पहाटे महिलेच्या गळ्यातील सोने हिसडा मारून केले लंपास
याप्रकरणी ज्योती वृषभ उपाध्ये (वय 47, पाटील गल्ली, जैन मंदिराच्या पाठीमागे, अंकली, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी ज्योती उपाध्ये या मिरज तालुक्यातील अंकली गावामध्ये राहतात. उपाध्ये या मंगळवारी सकाळच्या सुमारास अंकली रेल्वे पुलाजवळून घरी चालत निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एक काळ्या रंगाची दुचाकी त्यांच्या नजीक येवून थांबली.
त्यावर तोंडाला मास्क लावलेला पुरुष आणि त्याच्या पाठीमागे बुरखा आणि पॅट घातलेली व्यक्ती होती. त्यांनी ज्योती यांच्या गळ्यातील 14 ग्रॅम वजनाचे गंठन हिसकावले. यावेळी ज्योती उपाध्ये या रस्त्यावर पडल्या. त्यांनी आरडाओरडा करेपर्यत चोरटे दुचाकीवरुन पसार झाले.
घडलेल्या या घटनेनं गावात खळबळ उडाली. या प्रकरणी ज्योती उपाध्ये यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून उपाधीक्षक संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










