sangli bank news : जिल्हा बॅँकेतील त्या आठ संचालकांना अपात्र ठरवा सुनिल फराटे : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह बॅँकेतील आठ संचालकांचा दहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. त्यामुळे या सर्व संचालकांना बॅँकिंग नियमन कायद्यातील सुधारणे नुसार व आरबीआयच्या आदेशाप्रमाणे अपात्र ठरवावे. या मागणीसाठी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल फराटे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे.
sangli bank news : जिल्हा बॅँकेतील त्या आठ संचालकांना अपात्र ठरवा सुनिल फराटे
उच्च न्यायालयात याचिका दाखल
या याचिकेत राज्याचा सहकार विभाग, आरबीआय, सहकार आयुक्त, विभागीय सह निबंधक कोल्हापूर, सांगली जिल्हा बॅँक व संबधीत संचालकांना प्रतिवादी करण्यात आले आहे. यात बॅँकेचे अध्यक्ष मानसिंगरा नाईक यांच्यासह संचालक दिलीपतात्या पाटील, संग्राम देशमुख, खा. विशाल पाटील, बाळासाहेब होनमोरे, मोहनशेठ कदम, सुरेश पाटील, महेंद्र लाड यांचा समावेश आहे. या संचालकांचा बॅँकेतील संचालक पदाचा कार्यकाळ दहा वर्षापेक्षा जास्त झाला आहे.
केंद्र शासनाने बॅँकिंग कायद्यात सुधारणा केली असून सलग दहा वर्ष संचालक असलेल्यांना अपात्र ठरवले आहे. आरबीआयने याबाबत परिपत्रक काढले आहे. याची अंमलबजावणी करून या आठ संचालकांना अपात्र ठरवावे अशी मागणी केली होती. यासाठी बॅँकेला व सहकार विभागाला नोटीस बजावली होती. मात्र यावर कारवाई न झाल्याने याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सुनिल फराटे यांनी सांगीतले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










