ashta ekection news : शांत, संयमी, निष्कलंक उमेदवारांना निवडून द्या : आ. जयंत पाटील : माजी आमदार विलासराव शिंदे यांनी आष्टा शहर फुलासारख जपलं, वळण मोडू दिली नाही, नेहमी शहरात सौख्य व शांतता कायम राखली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार्या शांत, संयमी, निष्कलंक नगराध्यक्ष म्हणून विशाल शिंदे यांना तसेच वार्डाचा शहराचा विकास करणार्या मेहनती अधिकृत नगरसेवकांना निवडून द्या. असे आवाहन आ.जयंत पाटील यांनी केले.
ashta ekection news : शांत, संयमी, निष्कलंक उमेदवारांना निवडून द्या : आ. जयंत पाटील
आष्टा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विशाल शिंदे यांच्या प्रचारार्थ गोर्डे चौक आष्टा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष प्रणित आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीने विशाल शिंदे यांनी सोमवारी शहरातून पद यात्रा भव्यशक्ती प्रदर्शन करीत नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला.
यावेळी रत्नप्रभा विलासराव शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, विशाल शिंदे,दिलीपराव वग्याणी,झुंझारराव पाटील, विराज शिंदे, राघूनाथ जाधव, संग्राम जाधव, तानाजी सूर्यवंशी, शैलेश सावंत, माणिक शेळके, नियाजुलहक नायकवडी, शकील मुजावर, रामचंद्र सिद्ध, शिवाजी चोरमुले, रवींद्र पाटील, संदीप तांबवेकर, भाग्यश्री शिंदे, झीनत अत्तार, विद्याताई शिंदे, तेजश्री बोंडे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले शहरातील बेघर लोकांना घरे बांधून देण्याचा महाराष्ट्रात विक्रम विलासराव शिंदे यांनी केला. शहरात कामापेक्षा जाहिरात बाजीला महत्व जादा दिल जात आहे. काम काय केलं, काय करणार हे सांगण्याची निवडणूक असते पण वेगळ्या वळणाने निवडणूक लढू पाहणार्यांपासून सावध राहा. कमी बोलणारा पण काम जादा करणारा नगराध्यक्ष म्हणून विशाल शिंदेला निवडून आणणे ही विलासराव शिंदे यांच्यानंतर माझी जबाबदारी आहे. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांचे दहा दिवसासाठी जमलं आहे.
निवडणूक झाल्यानंतर कोणीही तुमच्याकडे फिरणार नाही. अशी टीका महाविकास आघाडीवर त्यांनी केली. महाविकास आघाडीचे टार्गेट आष्ट्यात विकास करणे नव्हे तर जयंत पाटील यांचा बिमोड करणे हे आहे. परंतु स्वाभिमानी जनता कुणापुढे झुकणारी नाही. छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचे पुतळे, चौवीस तास पाणी, क्रीडांगण, अंडर ग्राउंड वायरिंग, शैक्षणिक सुविधा, पाणंद रस्ते, महिलेने उद्योगआदी कामे करणार आहोत.धैर्यशील शिंदे स्वतः निवडणूक लढवणार नाहीत त्यांनी माघार घेतली याबद्दल जयंतराव पाटील यांनी त्यांच्या सयंमी, हजरजबाबी, निष्ठा, त्याग वृत्तीचे कौतुक केले.
आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे म्हणाले, यावेळी आष्टा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी पन्नास टक्के नवीन चेहर्यांना संधी दिली आहे. आमच्याकडे निष्ठतेने काम करणारी माणसे आहेत. आशा निष्ठावंतांना प्रामाणिक कामाच्या उमेदवारांना निवडून द्या व श्रेयवाद घेणार्यांना घरी बसवा.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











