jain samaj news : जैन अल्पसंख्याक महामंडळास शंभर कोटी तत्काळ द्या : जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला तातडीने शंभर कोटी रुपयांचा शासकीय निधी उपलब्ध करण्यात यावा, याबाबत भाजपा जैन प्रकोष्ट विभागाचे राज्य उपाध्यक्ष आणि जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
jain samaj news : जैन अल्पसंख्याक महामंडळास शंभर कोटी तत्काळ द्या
रावसाहेब पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्रातील जैन अल्पसंख्यांक समाज आर्थिक, शैक्षणिक तसेच व्यावसायिक प्रगतीसाठी नेहमीच सकारात्मक पावले उचलत आला आहे. मात्र समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ठोस योजना राबविणे अत्यावश्यक आहे. मागील वर्षी स्थापन झालेल्या या महामंडळास निधी प्राप्त न झाल्याने जैन समाजाच्या विकास योजनांना गती मिळू शकलेली नाही.
या मागणीसंदर्भात पाटील यांनी मिरज विधानसभा क्षेत्राचे आमदार सुरेश खाडे आणि सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर गाडगीळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाची प्रत सुपूर्द केली. दोन्ही आमदारांनी हा मुद्दा गांभीर्याने घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आवश्यक निधी मिळवण्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
जैन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या योजना सरु करण्यास हा निधी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाकडून या मागणीवर सकारात्मक निर्णय लवकरच मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











