ashta election news : “ आष्ट्यात पाणीपुरवठ्याची क्रांती… जनतेच्या दारात नवजीवनाची धार” : वाळवा तालुक्यातील आष्ट्यातील सुरुवातीच्या काळात आपल्या नगरपरिषदेकडे पिण्याच्या पाण्याची फक्त दोनच स्रोत… लंगोड बंध व्हिहीर आणि जूनी विहीर!
या दोन श्वासांवर अर्धं शहर तहान भागवत होतं. जुन्या पाईपलाईनला काळाचं गालबोट, गंज, गळती आणि तुटाफूट…पण नागरिकांची सोस मात्र थांबायला तयार नव्हती.
ashta election news : “ आष्ट्यात पाणीपुरवठ्याची क्रांती… जनतेच्या दारात नवजीवनाची धार”
पण जनतेचा नेता हा केवळ राजकीय पदासाठी नसतो… तो लोकांच्या दु:खाचा शब्द होत असतो!
आणि या शब्दाला उत्तर दिलं मा. विलासराव शिंदे साहेबांनी —
ज्यांच्या प्रयत्नांनी १९९९ साली तब्बल ७ कोटी ८० लाख रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना शहराच्या नशिबात आली.
शासन अनुदान ५०%, नगरपालिका कर्ज ४०% आणि नागरिकांचा हिस्सा १०% — अशी आकृती बंधिस्त असताना,
“जनतेची तहान माझ्यासाठी आकड्यांपेक्षा मोठी आहे!” असा निर्धार करून
शिंदे साहेबांनी ही योजना थेट केंद्र शासनाच्या UIDSMT योजनेत सामावून घेतली.
आणि मग —
केंद्र शासन ८०%
राज्य शासन १०%
पालिका १०%
अशी जनहितकारी सुवर्णअविष्काराची सुरुवात झाली!
जलक्रांतीची कामे — शहराच्या विकास इतिहासातील सर्वात मोठी उडी!
या योजनेत—
- अशुद्ध दाबनलिका पूर्ण बदल
- ५८०० मीटर नवीन पाईपलाईन
- तासगाव रोडवरील ९ लाख लिटर टाकी
- गांधी नगरची १.५० लाख लिटरची टाकी
- कोटेश्वर मंदिराजवळची २ लाख लिटरची उंच टाकी
- १ व ६ पाण्याच्या टाक्या
- आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र
- नवीन दाबनलिका आणि नवीन मीटर बसवणे
एकूण १२ कोटींची कामे पूर्ण होऊन शहरात पाणीपुरवठ्याचा नवा इतिहासच लिहिला गेला.
आज…
प्रत्येक वाडा—माळी मळा, बासुंडे मळा, शिंदे मळा—
प्रत्येक घरातील नळात वहाणाऱ्या पाण्यात एक भावना मिसळलेली असते—
“हे पाणी आमच्या माणसाच्या सेवाभावाचं फळ आहे!”
उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जाणवू नये म्हणून २०३ बोअरिंग मारण्यात आले
त्यापैकी ९० बोअरिंग यशस्वीरीत्या पुनर्भरण करून शहराला सुरक्षित जलजीवन देण्यात आलं.
आणि आज… या वारशाचा ध्वज उंच धरून उभा आहे — विशाल शिंदे!
आज आपले विशाल शिंदे
आष्टा नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी जनतेसमोर उभे आहेत.
त्यांच्या अंगात आहे—
विलासराव शिंदे यांच्या कामाचा वारसा,
विचारांची शिस्त,
सेवेची परंपरा आणि लोकांवरील अपरंपार प्रेम.
ज्यांच्या हृदयात जनतेचा दरारा आहे,
ज्यांच्या शिरात सेवाभावाची परंपरा वहाते,
आणि ज्यांच्या प्रत्येक श्वासात एकच स्वप्न —
“आष्टा अधिक सक्षम, अधिक विकसित, अधिक सुखी व्हावी!”
“काम बोलतं… आणि वारसा माणूस घडवतो!”
विलासराव शिंदे यांच्या कार्याने शहराला पाणीपुरवठ्याची क्रांती मिळाली…
आणि आज तीच कार्यण्याची परंपरा,
तोच विकासाचा ध्यास,
आणि तीच जनसेवेची निष्ठा
विशाल शिंदे यांच्या रूपाने जनतेपुढे उभी आहे.
म्हणूनच…
आष्टा शहराला जेथे काम दिसते, तेथे विश्वास उगवतो…
आणि जिथे विश्वास उगवतो, तिथे विशाल शिंदे यांची विजयगाथा लिहिली जाते!
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.







जलक्रांतीची कामे — शहराच्या विकास इतिहासातील सर्वात मोठी उडी!
आणि आज… या वारशाचा ध्वज उंच धरून उभा आहे — विशाल शिंदे!
म्हणूनच…




