nagarpalika election : जिल्ह्यात दुरंगी, तिरंगी लढती, तासगावला चौरंगी

SHARE:

nagarpalika election : जिल्ह्यात दुरंगी, तिरंगी लढती, तासगावला चौरंगी : जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष 28 आणि नगरसेवक पदाचे 347 असे मिळून तब्बल 375 जणांनी माघार घेतली. नगराध्यक्ष पदाच्या आठ जागांसाठी 41 तर नगरसेवक पदासाठी 594 उमेदवार रिंगणात आहेत.

nagarpalika election : जिल्ह्यात दुरंगी, तिरंगी लढती, तासगावला चौरंगी

नगराध्यक्षासाठी 41 तर नगरसेवकसाठी 594 उमेदवार रिंगणात, 375 जणांची माघार

बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारांची मनधरणी केली, काही ठिकाणी बंडखोरी रोखण्यात यश आले. इस्लामपूर, आष्टा, विटा नगरपालिका व शिराळा आणि आटपाडी नगरपंचायतसाठी दुरंगी, तर जत आणि पलूस नगरपरिषदेसाठी तिरंगी लढत होत आहे. तासगाव नगरपरिषदेसाठी चौरंगी लढत होणार असल्याचे अर्ज माघारीच्या दिवशी स्पष्ट झाले. नगरपालिकांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने शनिवारपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

जिल्ह्यातील इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा, जत आणि पलूस नगरपालिका तर शिराळा आणि आटपाडी नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. नगरपरिषद व नगरपंचायतसाठी 17 नोव्हेंबरपून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. नगरपालिकेसाठी तब्बल 1063 अर्ज तर नगरपंचायतीसाठी 412 अर्ज दाखल झाले.

उमेदवारी अर्ज छानणीमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 1 हजार 678 अर्जांपैकी 518 अर्ज अवैद्य ठरले. नगराध्यक्ष पदाच्या 8 जागांसाठी आता 69 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 941 अर्ज पात्र ठरले आहेत. अर्ज माघारीची शुक्रवारी शेवटची मुदत होती. निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नाराजी वाढली होती. ज्येष्ठ नेत्यांसह स्थानिक पदाधिकार्‍यांची शब्द देऊन समजूत काढण्यात काही ठिकाणी यश आले. परंतु काही ठिकाणी बंडखोरी रोखण्यात अपयश आले.

अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष 28 आणि नगरसेवक पदाचे 347 असे मिळून तब्बल 375 जणांनी माघार घेतली. नगराध्यक्ष पदाच्या आठ जागांसाठी 41 तर नगरसेवक पदासाठी 594 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारीनंतर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना अपेक्षित होता. परंतु स्थानिक राजकारणानुसार चित्र बदलले आहे. अनेक ठिकाणी महायुतीत फूट पडली आहे तर काही ठिकाणी महाविकास आघाडीत अंतर्गत विसंवाद प्रकर्षाने दिसून आला. ज्या ठिकाणी समझोता शक्य झाला, तेथे स्थानिक स्तरावर युती करण्यात आली आहे.

इस्लामपूर, आष्टा, विटा नगरपालिका व शिराळा आणि आटपाडी नगरपंचायतसाठी दुरंगी, तर जत आणि पलूस नगरपरिषदेसाठी तिरंगी लढत होत आहे. तासगाव नगरपरिषदेसाठी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

ऊरुण-ईश्वरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसेचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात महायुती अशी दुरंगी लढत होत आहे. महायुतीकडून भाजपचे विश्वनाथ डांगे विरुद्ध आनंदराव मलगुंडे अशी थेट लढत होत आहे. आष्टा येथे राष्ट्रवादीचे माजी आ. स्वर्गीय विलासराव शिंदे गट व जयंत पाटील यांचा गट आणि विरोधात महायुती अशी दुरंगी लढत आहे. माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे विरुद्ध महायुतीकडून प्रविण माने अशी दुरंगी लढत आहे. विटा नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे आ. सुहास बाबर विरुद्ध भाजपचे आ.गोपीचंद पडळकर व भाजप नेते वैभव पाटील यांच्या गटात दुरंगी निवडणूक होईल.

आटपाडी नगरपंचायतीसाठी महायुतीमध्ये दुरंगी लढत होत आहे. भाजप आ. गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख विरोधात शिंदे गटाचे आ. सुहास बाबर व जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील अशी लढत आहे. शिराळा नगरपंचायतीमध्ये दोन राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिंदे गट शिवसेना अशी लढत होत आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. व जिल्हा बँकेच अध्यक्ष मानसिंगराव नाईक विरुद्ध भाजप आ. सत्यजित देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक व एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यात रंगला आहे. जतमध्ये काँग्रेस, भाजप आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी निवडणूक होत आहे.

नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे सुजय शिंदे, भाजपकडून डॉ. रविंद्र आरळी आणि राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे अशी नगराध्यक्षपदासाठी लढत आहे.
पलूस नगरपरिषदेसाठी तिरंगी लढत होत आहे. काँग्रेस, भाजप आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होईल. तासगाव नगरपरिषदेसाठी चौरंगी लढत होत आहे. आ. रोहित पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील, भाजप आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगणार आहे.

नगराध्यक्ष आणि नगसेवक पदाचे उमेदवार
नगरपालिका नगराध्यक्ष नगरसेवक
ईश्वरपूर 6 94
विटा 3 69
आष्टा 2 72
तासगाव 5 88
जत 7 94
पलूस 6 67
शिराळा 8 50
आटपाडी 4 60
एकूण 41 594

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *