sangli bank news : जिल्हा बँकेने केवायसीसाठी 6 लाख खाती गोठवली

SHARE:

sangli bank news : जिल्हा बँकेने केवायसीसाठी 6 लाख खाती गोठवली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने खातेदारांना केवायसी करण्याबाबत वारंवार सुचना दिल्या होत्या. मात्र अजूनही लाखो खातेदारांनी रीकेवायसी केलेली नाहीत. परिणामी संबधीत खातेदारांना शासन अनुदानाचा लाभ मिळेना. त्यामुळे आता बॅँकेने अशा सुमारे 6 लाख खातेदारांची खाती गोठवली आहे. त्यांनी तातडीने बॅँकेशी संर्पक साधून रीकेवायसी करावी. यासाठी सुट्टीदिवशीही शनिवार व रविवारी बॅँकेचे कामकाज सुरु राहणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

sangli bank news : जिल्हा बँकेने केवायसीसाठी 6 लाख खाती गोठवली

केंद्र व राज्य शासनाकडून शेतकर्‍यांना मिळणारे विविध प्रकारचे अनुदान, मदत जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून संबधीत लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग होत असतो. सध्या अतिवृष्टी, पिक विमा व अन्य प्रकारची मदत शासनाकडून जमा होत आहे. मात्र अनेक शेतकर्‍यांची रीकेवायसी नसल्याने त्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यात अडचणी येत आहे. वास्तविक जिल्हा बॅँकेने गेल्या काही दिवांपासून खातेदारांना वारंवार री केवायसी करण्याचे अवाहन केले आहे.

मात्र याला फारसा प्रतिसाद मिळेलला नाही. त्यामुळे आता बॅँकेने खातेदारांच्या मोबाईल नंबरवर मॅसेज करून रीकेवायसी करण्याचे अवाहन केले आहे. सुमारे 24 लाख खातेदारांना असे मॅसेज पाठवण्यात आले आहे.

शासन अनुदानास पात्र असलेल्या सहा लाख खातेदारांची बॅँक खाती रीकेवायसीसाठी गोठवण्यात आली आहेत. या सर्व खातेदारांनी बॅँकेशी आधार कार्ड व पॅन कार्ड घेवून बॅँकेशी संर्पक करावा आणि रीकेवायसी करावी. यानंतर त्यांचे खाते पुर्ववत सुरु होईल. रीकेवायसीसाठी सुट्टी दिवशीही शनिवार दि. 22 व रविवार दि. 23 रोजी जिल्हा बॅँकेच्या सर्व शाखा सुरु राहणार आहेत. तसेच अन्य दिवशी जिल्हा बॅँकेच्या शाखांमधील कॅशची वेळ दोन तासांनी वाढवून 6 वाजेपर्यंत करण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

रीकेवायसीसाठी आबीआयकडून कारवाईचा इशारा
रिझर्व्ह बॅँकेने सर्व खातेदारांची रिकेवायसी करण्याचे आदेश बॅँकांना दिला आहे. खातेदारांची रीकेवायसी न करणार्‍या बॅँकांवर रिझर्व्ह बॅँकेने कारवाईचा बडगा उगारला असून काही बॅँकाना दंडही केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेलाही रिझर्व्ह बॅँकेने खातेदारांची रीकेवायसी करावी अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभुमीवर जिल्हा बॅँकेने खातेदारांच्या रीकेवायसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *