mahapalika news : महापालिकेत एकूण मतांच्या 6 टक्के दुबार मते : महापालिका प्रशासनाने 4 लाख 54 हजार 428 प्रारूप मतदारांची यादी गुरूवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये सुमारे 25 हजार 119 म्हणजे सहा टक्के मतदार दुबार आहेत. सर्वाधिक मतदार 1 हजार 617 हे मिरज येथील प्रभाग क्रमांक चारमध्ये आहेत. त्यामुळे दुबार मतदारांचा मुद्दा पुन्हा चर्चेला गाजण्याची शक्यता आहे.
mahapalika news : महापालिकेत एकूण मतांच्या 6 टक्के दुबार मते
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार प्रारुप मतदार यादी गुरुवारी जाहीर केली आहे. त्यानुसार 20 प्रभागात एकूण 4 लाख 54 हजार 428 मतदार आहेत. मागील 2018 मधील निवडणूकीच्या तुलनेत आता 30 हजार 249 मतदार वाढले आहेत. तर या मतदार यादीत तब्बल 25 हजार 119 मतदारांची दुबार नावे आहेत. या मतांना स्टार करण्यात आला आहे. एकूण मतांच्या तुलनेत दुबार मताची टक्केवारी 6 आहे. त्यामुळे मतदानावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या मतदारांची पडताळणी करून त्यांना एकाच ठिकाणी मतदान करण्यास प्रशासनाकडून सांगण्यात येणार आहे. दुसर्या ठिकाणी त्यांना मतदान करता येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. पण कोणत्या प्रभागात मतदान करायचे याचा अधिकार मतदाराला आहे. त्यामुळे उमेदवारानुसार मतदार प्रभाग ठरवू शकतात. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक दुबार मते ही मिरज येथील प्रभाग क्रमांक चारमध्ये आहेत. या प्रभागात तब्बल 1 हजार 617 मतदार दुबार आहेत. तर सर्वात कमी मतदार हे मिरज येथील प्रभाग क्रमांक वीसमध्ये आहेत. या ठिकाणी केवळ 591 दुबार मतदार आहेत.
यासह इतर प्रभागात असलेली दुबार मते- प्रभाग क्रमांक एक- 600, प्रभाग दोन- 1144, प्रभाग तीन- 905, प्रभाग क्रमांक- 1617, प्रभाग पाच- 976, प्रभाग सहा- 740, प्रभाग सात- 1371, प्रभाग आठ- 1290, प्रभाग नऊ- 1490, प्रभाग दहा- 1259, प्रभाग अकरा- 1371, प्रभाग बारा- 1099, प्रभाग तेरा- 1150, प्रभाग चौदा- 1479, प्रभाग पंधरा- 1377, प्रभाग सोळा- 1595, प्रभाग सतरा- 1208, प्रभाग अठरा- 1040, प्रभाग एकोनिस- 1223 तर प्रभाग क्रमांक 20 मध्ये 591 मते दुबार आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











