ashta nagarpalika news : सतीश माळींचा विकास विचार, आष्ट्यात प्रभाग 8 मधून उठणार नवा झंकार सर्वसामान्य कुटुंबातून सामाजिक कार्याची सुरुवात करणारे आणि आज आष्टा शहराच्या राजकीय व सामाजिक जीवनात सक्रिय भूमिका बजावणारे माजी नगरसेवक सतीश माळी यांनी पुन्हा एकदा प्रभाग 8 मध्ये परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार – आपल्या राजकीय प्रवासाचे बळ म्हणजे जनतेचा विश्वास आणि नेत्यांचे आशीर्वाद. आमदार जयंतराव पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि जिल्हा बँकेचे संचालक दिलीपतात्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग 8 मध्ये विकासाचा नवा अध्याय लिहिणार आहोत.
ashta nagarpalika news : सतीश माळींचा विकास विचार, आष्ट्यात प्रभाग 8 मधून उठणार नवा झंकार
माळी म्हणाले की, गेल्या काही वर्षांत आमच्या प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरणासाठी कार्य, तसेच प्राथमिक पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. परंतु हे फक्त सुरुवात आहे. येणार्या काळात प्रभाग 8 च्या प्रत्येक गल्लीत विकासाची नवी किरणं पसरतील.
प्रभागातील महिलांचे संघटन मजबूत करण्याचे श्रेय सौ. पुष्पलता माळी यांना जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग घेत समाजातील योगदान अधिक प्रभावी केले आहे.
सतीश माळी पुढे म्हणाले -राजकारण म्हणजे केवळ निवडणुकीचे रणांगण नाही, तर ती सेवा, त्याग आणि जनतेशी असलेली जिव्हाळ्याची नाळ आहे. आमदार जयंतराव पाटील आणि दिलीपतात्या यांच्या प्रेरणेने आम्ही लोकांच्या मनात आशेचा दीप प्रज्वलित केला आहे. आगामी निवडणुकीत प्रभाग 8 हा विजयाचा किल्ला ठरेल, यात मला पूर्ण विश्वास आहे.
शहराच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र छाप निर्माण करणार्या सतीश माळी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 8 मध्ये नव्या जोमाने कार्य सुरू झाले आहे. त्यांच्या संघटनेच्या पाठबळाने, कार्यकर्त्यांच्या निष्ठेने आणि नागरिकांच्या पाठिंब्याने हा प्रभाग विकासाच्या सुवर्णपथावर नेण्याची शपथ त्यांनी घेतली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











