asia trophy news : पाकिस्तानी मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन गेला पळून : आशिया कपचा अंतिम सामना झाल्यानंतर ट्रॉफीवरुन मैदानात जोरदार राडा झाला. एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे मोहसीन नक्वीच्या हस्ते आशिया कपमध्ये जेतेपद पटकावणार्या संघाला ट्रॉफी दिली जाणार होती. मात्र भारतीय संघाने मोहसीन नक्वीच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर साधारण 70-80 मिनिटं नाट्यमय गदारोळ झाला.
asia trophy news : पाकिस्तानी मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन गेला पळून
भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत करत नऊव्यांदा किताब पटकावला. पाकिस्तानी संघ 20 षटकांत 146 धावांत गारद झाला. त्यानंतर विद्यमान विजेता भारताने 5 गडी गमावून लक्ष्य सहज गाठले. शेवटच्या षटकात 10 धावांची गरज असताना तिलक वर्माने हरिस रौफच्या चेंडूला मिडविकेट स्टँडमध्ये षटकार मारला आणि त्यानंतर रिंकू सिंगने चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. यादरम्यान, अंतिम सामना झाल्यानंतर ट्रॉफीवरुन मैदानात जोरदार राडा झाला.
दरम्यान, भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. पण पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं उपविजेतेपदाचा धनादेश एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते स्वीकारला. त्यानंतर मोहसीन नक्वी आशिया चषकाची ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंची मेडल्स घेऊन मैदानातून निघून गेला.
नेमकं काय घडलं?
एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही आहेत. त्यामुळंच भारतीय संघानं मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. भारतीय संघाच्या या जिद्दानंतरही मोहसीन नक्वी देखील ट्रॉफी देण्यासाठी हट्ट करत होते. त्यानंतर ट्रॉफी न घेण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला. शेवटपर्यंत भारतीय संघाने ट्रॉफी घेतली नाही.
अखेर ट्रॉफी न घेताच भारतीय संघाने सेलिब्रेशन केले. त्यानंतर मोहसीन नक्वी मैदानातून ट्रॉफी घेऊन निघून गेले. पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलेलं. तसंच फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं. आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास नकार दिला.
त्यामुळं आशिया चषकाचा पारितोषिक वितरण सोहळा तासभरापेक्षा उशिरानं सुरु झाला. तेवढा वेळ मोहसीन नक्वी हे एकटेच व्यासपीठावर उपस्थित होते. पाकिस्तान संघही जवळजवळ 55 मिनिटं ड्रेसिंगरूममध्येच बसून होता.
asia-trophy-news-pakistani-mohsin-naqvi-ran-away-with-the-trophy
या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पाकिस्तानवर टोला मारत एक पोस्ट केली, ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर फक्त सहा शब्दांत एक ट्विट केले. गंभीर यांनी द (ट्विटर) वर लिहिलं की, अचूकपणे प्रतिस्पर्ध्याला उत्तर देणारा ठरला. बाह्य गोष्टींकडे दुर्लक्ष करून, त्यांनी खेळामध्ये खरी जिंकणारी गोष्ट म्हणजे इरादा हेच असल्याचं ठळकपणे दाखवून दिलं.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











