maharashtra chembar of commars news : रविंद्र माणगावे, सांगलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या शिखरावर

SHARE:

maharashtra chembar of commars news : रविंद्र माणगावे, सांगलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या शिखरावर : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर या राज्यातील सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षपदी सांगली जिल्ह्याच्या सावळवाडी या साध्या खेड्यात जन्मलेले श्री. रविंद्र माणगावे आज बिनविरोध निवडून आले आणि मुंबईच्या मुख्यालयात त्यांनी अध्यक्षपदाचा मानाचा पदभार स्वीकारला.

maharashtra chembar of commars news : रविंद्र माणगावे, सांगलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या शिखरावर

ही केवळ निवड नव्हे, तर सांगलीच्या भूमीने पहिल्यांदाच या शिखरपदावर गवसलेला सन्मान आहे. शेतकरी कुटुंबातून आलेले, उद्योगविश्वात स्वतःचा ठसा उमटवणारे, आणि चेंबरमध्ये विविध पदांवर निष्ठेने कार्य करून आज सर्वोच्च स्थानावर पोहोचलेले माणगावे हे जिल्ह्याच्या कर्तृत्वाचे जिवंत प्रतीक ठरले आहेत.

या ऐतिहासिक प्रसंगी विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, माजी उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, संजय सोनवणे, दीपक परब, शंकर शिंदे, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन अंजु सिंघल, कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश अग्रवाल, वेदांशू पाटील, मनीष पाटील, सरकार्यवाह श्रीमती शितल पांचाल, माजी सरकार्यवाह सुरेश घोरपडे, उपसचिव नितीन शेलार यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या क्षणाचे साक्षीदार झाले.

maharashtra-chembar-of-commars-news-ravindra-mangave-from-the-soil-of-sangli-to-the-peak-of-maharashtra

🌟 “सावळवाडीचा हा पुत्र महाराष्ट्राच्या व्यापार–उद्योग क्षेत्राचे नेतृत्व करणार,” हीच जणू गावाची, जिल्ह्याची आणि राज्याची शान आहे.
रविंद्र माणगावे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल महाराष्ट्र चेंबरचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सभासदांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस सुवर्ण शुभेच्छा अर्पण केल्या.

✨🙏 सांगलीच्या मातीतून उगवलेले हे नवे नेतृत्व महाराष्ट्र उद्योगविश्वाला दिशा देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 🙏✨

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *