devandra fadanvis news : राज्यात एक कोटी लखपती दीदी करणार: देवेंद्र फडणवीस: राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असून येत्या काळात एक कोटी बहिणींना लखपती दीदी बनविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. विरोधक कितीही टीका करोत, पण महिलांसाठी सुरु केलेली कोणतीही योजना पुढील पाच वर्षे बंद होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
devandra fadanvis news : राज्यात एक कोटी लखपती दीदी करणार: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहिणींची कोणतीही योजना बंद होणार नाही,
भारतीय जनता पार्टीच्या ‘माझा भाऊ देवाभाऊ’ अभियानांतर्गत राज्यभरातील महिलांनी पाठविलेल्या हजारो राख्यांचा सोहळा शनिवारी पार पडला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बहिणींनी दिलेल्या प्रेमाचा स्वीकार करून त्यांना आभार मानले. या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, आमदार चित्रा वाघ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार विद्या ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, बहिणींच्या आशीर्वादाने 2029 मध्येही महाराष्ट्रात आमचेच सरकार सत्तेत येईल. महायुती सरकार महिलांच्या सहकारी संस्थांना हक्काचे स्थान देण्यासाठी कटिबद्ध आहे.
बहिणींसाठीची कोणतीही योजना बंद होणार नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधक म्हणतात की लाडक्या बहिणींसाठीची योजना बंद होणार. पण मी आश्वासन देतो की, 2029 पर्यंत लाडक्या बहिणींसाठी असणारी कोणतीही योजना बंद होणार नाही. त्यानंतर आमचे सरकार आले तर या सर्व योजना पुढेही सुरू ठेऊ.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











