kolhapur political news : राहुल पाटील-चंद्रदीप नरके मित्र बनतील – हसन मुश्रीफ : कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत आणखी तीन मतदारसंघ वाढणार आहेत. त्यामुळे वाद विसरून राहुल पाटील – चंद्रदीप नरके हे मित्र बनतील, असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे व्यक्त केले.
kolhapur political news : राहुल पाटील-चंद्रदीप नरके मित्र बनतील – हसन मुश्रीफ
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तरी शिंदे सेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी राजकीय स्पर्धा कायम राहणार असल्याचे विधान राहुल पाटील यांनी केले होते. त्यावर मुश्रीफ यांनी वरील मत व्यक्त करतानाच आपला गट टिकवण्यासाठी सगळ्यांकडूनच अशी वक्तव्ये होत असतात, अशी टिप्पणी केली.
राहुल पाटील, राजेश पाटील बंधूंसह दिवंगत आमदार पी. एन. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला हत्तीचे बळ मिळणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत युतीचा झेंडा फडकवण्यास मोठा हातभार लागणार आहे, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे आमदार सतेज पाटील यांनी इतकेही हळवे होऊ नये. दोन्ही मुलांना सहकार्य करता येणार नसेल, तर अपशकुन करून अडथळा आणू नये. त्यांना आशीर्वाद द्यावा, असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला.
शक्तिपीठ महामार्गाविरोधात 15 ऑगस्ट रोजी शेतशिवारात ध्वजारोहण करण्यासाठी, खर्डा-भाकर खाण्यासाठी सतेज पाटील यांनी नितीन राऊत यांनाही बोलवायला हवे होते, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











