vasantdada kharkhana news : जिल्हा बॅँक वसंतदादा कारखान्याची चार एकर जमीन विकणार : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बॅँकेन दत्त इंडिया कंपनीला चालवण्यास दिला आहे. मात्र गेली दोन वर्ष दत्त इंडिया कंपनीने कर्जाचे हप्ते भरले नाहीत. बॅँकेने कंपनील करार मोडून कारखाना ताब्यात घेण्याची नोटीस दिली आहे. दरम्यान कारखान्यांची चार एकर जमीन विक्री करुन थकीत 58 कोटींचे कर्ज वसुल करण्याचा निर्णयही बॅँकेने घेतला आहे. बॅँकेच्या संचालक मडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळाली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगीतले.
vasantdada kharkhana news : जिल्हा बॅँक वसंतदादा कारखान्याची चार एकर जमीन विकणार
संचालक मंडळाची मंजुरी ; 58 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाई
जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जासाठी वसंतदादा शेतकरी साखर कारखाना व कारखान्याची सर्व मालमत्ता जिल्हा बॅँकेने सिक्युरीटायझेशन क्ट अंतर्गत ताब्यात घेतली आहे. बॅकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात कारखान्याकडील थकबाकी वसुल करण्यासाठी हा कारखाना दत्त इंडिया कंपनीला दहा वर्षा मुदतीने चालवण्यात देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा बॅँक, वसंतदादा कारखाना व दत्त इंडिया यांच्यात त्रीपक्षीय करार झाला आहे.
त्यानुसार वसंतदादा कारखाना दहा वर्ष चालवून दत्त इंडियाने या कारखान्यावरील जिल्हा बॅँकेचे कर्ज या मुदतीत फेडायचे ठरले आहे. त्यावेळी दत्ता इंडिया कडून 60 कोटी रुपयांची अनामतही बॅकेने घेतली होती. मात्र यातील 30 कोटी रुपये कारखान्याची काही देणी देण्यास परत देण्यात आली तर 30 कोटी रुपये बॅँकेने कारखान्याच्या कर्जाला जमा करून घेतले त्यामुळे आता जिल्हा बॅँकेकडे अनामत रक्कम शिल्लक नाही.
दत्त इंडिया कंपनीने वसंतदादा कारखान्याच्या कर्जापोटी गेल्या काही वर्षात 78 कोटी रुपये जिल्हा बॅँकेत भरले आहे. यात तीन कोटींच्या अनामत रक्कमचेही समावेश आहे.
vasantdada-kharkhana-news-district-bank-to-sell-four-acres-of-vasantdada-factory-land
गेली दोन वर्ष कंपनीने कारखान्याच्या कर्जाच्या हप्ते थकवले आहेत. याप्रकरणी बॅँकेने वारंवार कंपनीला व कारखान्याला कळवले आहे. मुदतीत कर्ज परत फेड न केल्यास करार मोडून कारखाना पुन्हा ताब्यात घेण्याचा इशाराही बॅँकेने कारखाना व कंपनीला दिला आहे. कंपनीने सदरची थकीत रक्कम भरण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान आता बॅँकेने उर्वरीत थकीत 58 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी वसंतदादा कारखान्याची 4 एकर जमीन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरची जमीन विक्री करून कारखान्याचे 58 कोटी रुपये वसुल केले जाणार आहेत. याला बॅँकेच्या संचालक मंडळाने मान्यता दिली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगीतले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











