kasbe digraj news : स्मृतींच्या शिलालेखावर कोरलेले नाव – अधिवक्ता दिनकर नारायण कुरकुटे 

SHARE:

🌿

शामलकुमार आळतेकर,  कसबे डिग्रज

कसबे डिग्रसची ही माती जणू सतत अभिमानाने मिरवत असते – येथे जन्मलेले, येथे वाढलेले आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात नावाजलेले अधिवक्ता दिनकर नारायण कुरकुटे. नुकतेच एका अनपेक्षित अपघातात या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आणि गावभरच नव्हे तर संपूर्ण समाजमनावर शोककळा पसरली.

kasbe digraj news : स्मृतींच्या शिलालेखावर कोरलेले नाव – अधिवक्ता दिनकर नारायण कुरकुटे 

त्यांचे जीवन म्हणजे साधेपणातली थोराई, मेहनतीतला अढळ विश्वास आणि लोकांच्या हितासाठी लढणाऱ्या वकिलाची उज्ज्वल ओळख. सांगली येथे वकिलीचे शिक्षण पूर्ण करून, त्यांनी इचलकरंजी या औद्योगिक नगरीत वकिली व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाने ते जनमानसात पोहोचले, आणि पश्चिम महाराष्ट्राच्या कोपऱ्यात कोपऱ्यात “कुरकुटे वकील” हे नाव आदराने घेतले जाऊ लागले.
कसबे डिग्रजचे कुरकुटे कुटुंब म्हणजे गावाला नेहमीच अभिमान वाटावा असे कुटुंब. संकटांच्या क्षणी, दु:खाच्या सावलीत किंवा आनंदाच्या क्षणात – रात्र असो की दिवस, हे कुटुंब माणसांच्या मदतीला तत्पर. त्या दानशूर, आपुलकीच्या वृत्तीला खरेच आधारस्तंभ होते दिनकरराव. त्यामुळे त्यांच्या जाण्याने केवळ एक कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण गाव उघडेपणाची जाणीव करीत आहे.
वकिलीच्या बरोबरच व्यापार क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला. सांगलीतील गजबजलेल्या मारुती रोडवर उभारलेले “शितल मॅचिंग सेंटर” हे त्यांच्या व्यावसायिक दूरदृष्टीचे उदाहरण. थोरल्या कन्या शितलच्या नावाने सुरू केलेले हे कापड दुकान आजही त्यांच्याच कष्टांचे जिवंत स्मारक ठरते.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात केवळ वकिलीच्या तेजाचा प्रकाश नव्हता, तर माणुसकीची ऊबही होती. गावातील तरुणांना मार्गदर्शन, नातलगांना आधार, मित्रांना साथ आणि प्रत्येक गरजवंताला आपलेपणाने दिलेला हात – हे त्यांच्या जीवनाचे गमक.
आज त्यांच्या जाण्याने पत्नी, मुलगा, तीन मुली, जावई, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार डोळ्यांत पाणी घेऊन उभा आहे. पण त्या परिवारासह संपूर्ण कसबे डिग्रज, इचलकरंजी आणि सांगली या समाजभूमीवर त्यांनी जी नांदी उमटवली आहे, तीच त्यांची खरी वारसा ठरते.

kasbe-digraj-news-name-engraved-on-smritis-inscription-advocate-dinkar-narayan-kurkute

त्यांचे नाव आता स्मृतींच्या आकाशात एका ध्रुवताऱ्यासारखे तेजाळत राहील –
लोकांसाठी जगलेले, लोकांसाठी झटलेले आणि लोकांच्या हृदयात चिरंतन जागा करून गेलेले.
🌸 “कुरकुटे वकील” हे नाव आता केवळ आठवणीत नव्हे, तर प्रेरणेत जिवंत राहील. 🌸
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *