gadingalaj news : गडहिंग्लजमध्ये चक्क भाजप, काँग्रेस एकत्र तर दोन्ही शिवसेनेची ‘महायुती’ : गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना थोपवण्यासाठी जनता दल, भाजप, काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, एकनाथ शिंदे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य शक्ती असे सारेच पक्ष एकत्र आले आहेत. ‘व्यक्ती विरोधातील लढा’ असे गडहिंग्लजच्या गडाच्या लढतीला स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे येथे राजकीय विचारांना तिलांजली देत समीकरणे घडू लागली आहेत.
gadingalaj news : गडहिंग्लजमध्ये चक्क भाजप, काँग्रेस एकत्र तर दोन्ही शिवसेनेची ‘महायुती’
मुश्रीफांविरोधात सर्व पक्षांची आघाडी
गडहिंग्लज हा जनता दलाचा राज्यातील एकमेव उरलेला गड अशी स्थिती आहे. येथे जनता दलाचे दिवंगत प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची कन्या स्वाती कोरी यांनी जनता दलाचे ढासळते बुरुज टिकवून ठेवले आहेत. यामुळे येथे कोरी यांच्याशी हातमिळवणी करण्यासाठी सर्व पक्ष उत्सुक आहेत. त्याला कारण ठरले आहे ते वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना येथे रोखणे.
विधानसभेचे बीजारोपण
गडहिंग्लज नगरपालिकेसाठी अनुसूचित जमातीकरिता नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आहे. त्यामुळे येथे सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. गडहिंग्लज पालिका ही मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघातील सर्वांत मोठी पालिका. मुश्रीफ यांना येथे पालिका निवडणुकीत आवर घातला, की पुढे विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मार्गात काटे पेरणे सोपे जाणार असल्याची अटकळ त्यांच्या तमाम विरोधकांनी बांधली आहे. त्यातूनच गडहिंग्लज या राजकीय प्रयोगाची पहिली रंगभूमी ठरली आहे.
हसन मुश्रीफ यांनी चंदगड नगरपालिका निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही टोकाचे पक्ष एकत्रित आणले. या चालीस मात देण्यासाठी म्हणून गडहिंग्लजमध्ये घडामोडी घडत आहेत. चंदगडचे भाजपसमर्थक आमदार शिवाजी पाटील लगेचच गडहिंग्लजमध्ये डेरेदाखल झाले. त्यांनी स्वाती कोरी यांना भाजपचे पाठबळ दर्शवले. अर्थात, गडहिंग्लज शहरात शिवाजी पाटील यांचा प्रभाव तसा अदखलपात्र; तरीही केवळ मुश्रीफ यांच्या विरोधात वातावरणनिर्मिती करणे, त्यांना डिवचणे इतकाच उद्देश. महायुतीमधील भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरोधात चंदगड आणि गडहिंग्लज पालिकांमध्ये दंड थोपटून उभे आहेत.
दोन्ही सेना एकत्र
काँग्रेसचे विधान परिषद गटनेते सतेज पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक, आमदार विनय कोरे यांनीही जनता दलासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. हसन मुश्रीफविरोध या न्यायाने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समरजित घाटगे नव्या आघाडी सोबत राहणार आहेत. शिवसेनेचे दोन्ही गट उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हेही या नव्या आघाडीमध्ये खांद्याला खांदा लावून सोबत करणार आहेत.
राजकीय तिलांजली
जनता दलाने आजवर भाजपसारख्या जातीयवादी पक्षापासून फटकून राहण्याची भूमिका कायम घेतली आहे. मात्र आता गडहिंग्लजमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रित आले आहेत. अशीच स्थिती शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या पक्षांबाबतची. कोकणात हे दोन्ही गट एकत्रित येताना दिसत आहेत. त्याचीच पुनरावृत्ती गडहिंग्लजमध्ये होणार असे दिसत आहेजॠ सईतोष कु_ार ॠाईनी केलई Aाहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











