hutatma news : हुतात्मा कारखान्याला 550 कोटींचे कर्ज हा आरोपच खोडसाळपणाचा : वैभव नायकवडी

SHARE:

hutatma news : हुतात्मा कारखान्याला 550 कोटींचे कर्ज हा आरोपच खोडसाळपणाचा : वैभव नायकवडी : हुतात्मा साखर कारखान्याला 550कोटींचे कर्ज आहे हा ठिय्या आंदोलनकर्त्यांचा आरोप पूर्णपणे चुकीचे असून, कारखान्याला अन्य साखरकारखान्यांप्रमाणे केवळ 260कोटींचे कर्ज आहे.आंदोलनकर्ते सभासदांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप चेअरमन वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत केला . वैभव नायकवडी यांच्या विरोधात चाललेल्या ठिय्या आंदोलनाला 15 दिवस उलटल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेत आपली भूमीका स्पष्ट केली.

hutatma news : हुतात्मा कारखान्याला 550 कोटींचे कर्ज हा आरोपच खोडसाळपणाचा : वैभव नायकवडी

आंदोलनाच्या निमित्ताने कारखान्या संदर्भात ज्या बातम्या वचर्चा सुरु आहेत, माझ्यावर व माझ्या सहकारी सभासदांवर जे आरोप केले जाताहेत ते सर्व चुकीचे असून, हे सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे ही माझी भावना आहे. मोठा भाऊ व पुतणेच या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत याचे मला अतिव दुःख व यातना होत असल्याचे ते म्हणाले .अ‍ॅग्रो नित्यम ही कंपनी साखर खरेदी विक्री चा व्यवसाय करते . आतापर्यंत कंपनीच्या माध्यमातून 500 ते 600 कोटींची उलाढाल झाली असून, 30 ते 35लाखांदरम्यान वार्षिक नफा मिळाला आहे.

ज्याज्या वेळी काररवान्याला अडचण असेल त्या वेळी कंपनीने अन्य कंपनी वा व्यक्तीला प्रोत्साहन देत सहकार्य घेतले आहे . इतर कंपन्यां प्रमाणे अ‍ॅग्रो नित्यमने टेंडर पद्धतीने साखर खरेदी विक्रीचा व्यापार केला आहे .

हुतात्मा बझारने अ‍ॅग्रो नित्यम कंपनीला 92 लाख रक्कम दिल्याच्या आरोपात तथ्य नाही. हा लोकभावना भडकवण्याचा प्रकार आहे . केवळ 25 लाखांचे भांडवल असणारा बझार 92 कोटींची रक्कम कशी देणार असा सवाल त्यांनी व्यक्त केला. माझ्या कुटुंबाची 1कोटी , 30 लाख , 11 हजार इतकी स्थावर मालमत्ता असताना अवास्तव चुकीच्या वावड्या पसरवल्या जात आहेत.

किसान शिक्षण संस्थेच्या संदर्भात वैभव नायकवडी म्हणाले , या शिक्षण संस्थेचा ऑडीट रिपोर्ट पाहीला तर सर्व समजू शकते . ते पुढे म्हणाले,मी मुख्यमंत्र्यांकडे तडजोडीच्या संदर्भात हेलपाटे मारतोय अशा बातम्या सर्वत्र पसरवल्या जात आहेत प्रत्यक्षात कारखान्याच्या एनसीडीसी कामासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे गेलो होतो .त्यांनी देखील हुतात्मा, वारणा व घुले पाटील यांच्या कारखान्यांना एनसीडीसी लोन मंजूर केले असून, राज्य सरकारकडून प्रोव्हीजन झाल्यानंतर लोन मिळेल व मॉडेलायझेशनची कामे करता येतील .

एफ आर पी – एम एस पी तिढा सुटल्या शिवाय वेगवेगळ्या समस्या सुटणार नाहीत व कारखान्याची आर्थिक स्थिती विकसीत होणार नाही . इथेनॉल व साखर विक्रीतून भागत नसल्याने देणी भागवण्यासाठी प्रत्येक कारखान्याला नवीन कर्ज घ्यावे लागते . इतर कारखान्यांची माहिती घेतल्यास आंदोलनकर्त्यांना ते कळेल डिस्टलरी सुरु झाल्यानंतर सभा घेऊन सभासद शेतकर्‍यांच्या ठेवी परत केल्या आहेत . ही सर्व परिस्थीती सर्वांच्या सहकार्यातूनच बदलू शकते.

एक्स्पांशन व मॉडलायझेशनची कामे एनसीडीसी चे 148 कोटी मिळाल्यानंतर पूर्ण होतील तसेच असलेले कर्ज फेडण्याचे सोईचे होईल . कोगनोळी येथील पतसंस्थेला 20 कोटी दिल्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तर सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन असतात. हे आंदोलक मंडळी सोईस्कर विसरत असल्याचा त्यांनी खुलासा केला. कुटुंबातला मोठा भाऊ , पुतणे यांच्याशी वाद नको , घरगुती चर्चेतून प्रश्न सोडवता येईल म्हणून प्रयत्नही केला पण कुणीच दाद दिली नाही.याचा विपरीत परिणाम शेतकरी -व्यापारी यांच्यावर होऊ नये म्हणून इतके आरोप झाले तरी गप्प राहिलो .

जवळजवळ 30 वर्षे हुतात्मा कारखान्याची धुरा अन्य कुणाच्याही साथीविना एकट्याने सांभाळत राहिलो कारण हुतात्मा कुटुंबाचे दैवत क्रांतीवीर अण्णांचे विकासाचे स्वप्न साकार करण्याचा एकमेव उद्देश साध्य करणे एवढाच होता व आजही आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *