sangli news : ‘सांगली तळपणार; आठवड्यात तापमान विक्रमी 43 अंशावर पोहचणार’

SHARE:

sangli news : ‘सांगली तळपणार; आठवड्यात तापमान विक्रमी 43 अंशावर पोहचणार’ : जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिकच तीव्र होणार असून येत्या आठ दिवसात तापमान 39 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. दिवसभराच्या प्रखर उन्हामुळे रात्री आठ वाजेपर्यंत उकाडा कायम जाणवत आहे.

sangli news : ‘सांगली तळपणार; आठवड्यात तापमान विक्रमी 43 अंशावर पोहचणार’

गेल्या काही दिवसांपासून सांगलीत तापमान सातत्याने वाढत आहे. सध्या तापमान 39 अंशांच्या आसपास स्थिरावले असून दुपारच्या वेळेत उकाडा असह्य होत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, कोरडे आणि गरम वारे यामुळे उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार आहे. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे आरोग्यावरही परिणाम दिसून येत आहे.

उष्माघात, डोकेदुखी, अशक्तपणा, डिहायड्रेशन यासारख्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणार्‍या कामगारांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पाणी, लिंबूपाणी, ताक यांसारख्या द्रव पदार्थांचे अधिक सेवन करावे, हलके व सैल कपडे वापरावेत आणि उन्हापासून संरक्षणासाठी टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शेतकरी वर्गावरही या उष्णतेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पिकांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. उष्णतेची ही लाट पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

दिनांक व वार तापमान (अं.से.)
सोमवार दि.4 37
मंगळवार दि.5 38
बुधवार दि.6 39
गुरूवार दि. 7 39
शुक्रवार दि. 8 40
शनिवार दि. 9 40
रविवार दि. 10 41
सोमवार दि. 11 43
मंगळवार दि. 12 42
बुधवार दि. 13 43

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *