ichakaranji murdar news : इचलकरंजीतील तरुणाचे अपहरण करून निपाणीत निर्घृण खून, तिघे संशयित ताब्यात : येथील भोनेमाळ परिसरातील एका तरुणाचे मोटरसायकल रिपेअरच्या बहाण्याने अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुहास सतिश थोरात (वय 19, रा. भोनेमाळ, इचलकरंजी) असे अपहृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात आढळून आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
ichakaranji murdar news : इचलकरंजीतील तरुणाचे अपहरण करून निपाणीत निर्घृण खून, तिघे संशयित ताब्यात
सुहास याला शुक्रवारी (ता.5) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी ओंकार अमर शिंदे, ओंकार कुंभार (सर्व रा. लिगाडे मळा, इचलकरंजी) यांसह एक अल्पवयीन असे तिघेजण मोटरसायकल रिपेअर करायची आहे असा बहाणा करून जबरदस्तीने घेऊन गेले. मुलाच्या जीवितास धोका असल्याची भीती वाटल्याने त्याचे वडील सतीश थोरात यांनी याबाबत शुक्रवारीच शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली.
दरम्यान, शोधमोहीम सुरू असताना शनिवारी पहाटे देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला. तो मृतदेह सुहास थोरात याचाच असल्याची खात्री पोलिसांनी केली. प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले असून शरीरावर मारहाणीचे व जबर दुखापतीच्या गंभीर खुणा आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतले असून अपहरणापासून खूनापर्यंतची सर्व श्रृंखला तपासात उघड झाली आहे.
सुहासला कुठे नेण्यात आले, खून नेमका कशामुळे झाला, यात आणखी कोणी सामील आहे का याचा तपास सुरू आहे. सुहास थोरातचा निर्घृण खून उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात नातेवाईक व मित्रपरिवाराने गर्दी केली होती.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











