kolhapur news : शिकारी खुद यहाँ शिकार हो गया डुक्कर असल्याच्या संशयावरून शिकारीने केली सहकार्याची शिकार सावंतवाडी येथील ओवळीये येथील जंगलात डूक्कराची शिकार करण्यासाठी गेलेल्या शिकारीचीच शिकार झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. गुरूवारी डुक्कर दिसला म्हणून सकाळीच सर्वजण शिकारीसाठी गेले असतनाच डुक्कर हकवण्यासाठी रान काढत असतनाच अचानक डुक्कराच्या पावलांचा आवाज आला म्हणून मारलेल्या गोळीने सचिन सुभाष मर्गज (28 मर्गज वाडी वेर्ले) याचा वेध घेतला असून तो जागीच ठार झाला.
kolhapur news : शिकारी खुद यहाँ शिकार हो गया डुक्कर असल्याच्या संशयावरून शिकारीने केली सहकार्याची शिकार
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळावर जात पंचनामा केला व कोलगाव येथील शिप्रियान डॉन्टस याला ताब्यात घेण्यात आले आहे. सह्याद्री पट्ट्यातील सांगेली ओवळीये येथील जंगलात काही युवक शिकारीसाठी गेले होते.यातील सचिन मर्गज याला गुरूवारीच ओवळीये च्या जंगलात डुक्कर दिसून आला असल्याने त्याने आपल्या साथीदारांना यांची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी सकाळीच कोलगाव येथील शिप्रियान डॉन्टस यांच्यासह अन्य काही जण शिकारीच्या उद्देशाने जंगलात गेले होते. शिप्रियान कडे बंदुक असल्याने तो नेम धरून बसला होता.
तर अन्य काही जण डुक्कर यावा म्हणून रान काढत होते. त्यात सचिन होता..तो वाकून वाकून रान काढत असतनाच पायाचे मोठ मोठ्याने आवाज झाला म्हणून सुप्रियान ने डुक्कर असल्याचे दिसताच बंदुक रोखली समोर झाडात सचिन हा वाकून रान काढत होता.त्याचा समज झाला कि हाच डुक्कर आहे. रानात त्याला दिसले नाही आणि त्याने थेट बंदुकीचा बार सचिन च्या दिशेने रोखत अचूक वेध घेतला. मात्र प्रत्यक्षात तेथे डुक्कर नव्हताच.
या घडल्या प्रकाराने सर्वच जण घाबरून गेले होते.त्यानी सचिन मर्गज याचा मृतदेह तेथेच टाकून पळ काढला आणि स्थानिकांना माहिती दिली त्यानंतर सचिनचा मृतदेह सावंतवाडीतील रूग्णालयात हलविण्यात आला. सावंतवाडीत मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. याबाबतची माहीती मिळताच माजी सरपंच पंढरी राऊळ, ग्रामपंचायत सदस्य विजय राऊळ, बाळू गावडे, सुनील राऊळ, प्रसाद गावडे, सुनील मर्गज, सदा कदम, कृष्ण मर्गज, प्रकाश मर्गज, मोहन मर्गज, सतीश लिंगवत, माजी पंचायत समिती सदस्य बाबल अल्मेडा, रामदास मिस्त, सुरेश गावडे, बाबू शेटये, रामचंद्र चव्हाण, भगवान राणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्याचे वडील सुभाष मर्गज यांनी तक्रार दिली.
सचिनच्या हनवटीत गोळी तर छातीत शेरे
शिप्रियान याच्या बंदुकीच्या गोळीने सचिनचा वेध घेतल्यानंतर त्याला तत्काळ उपचार मिळाले नाही दुपारनंतर येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले.यावेळी सचिनच्या हनवटी तोडाला बंदुकीचे शेरे लागल्या होता.यातील मयत सचिन हा अविवाहित होता. तो गावात छोटी मोठी वेल्डीगचे काम करत होता.
तो मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याच्या अचानक जाण्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृत सचिन यांचे शिक्षण बारावी पर्यत झाले होते.तो वेर्ले येथील घरी न राहाता मावशीकडे सांगेली येथे राहत होता. तर आई वडील वेर्ले येथे राहत असून त्याच्या दोन बहिणीची लग्न झाली आहेत.घरी आई वडिल असतात वडिल छोटी मोठी मोलमजुरी करतात.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











