jat morcha on padalkar : पडळकरांची खालची भाषा महाराष्ट्राला अशांत करणारी : विक्रम सावंत : कसलाही सुस्कृतपणा नसलेला आणि भाजपने पोसलेल्या वाचाळवीर आ. गोपीचंद पडळकर यांनी अखंड महाराष्ट्रभर मराठा, ओबीसी, धनगर, बंजारा, मुस्लीम, ख्रिश्चीन अशा विविध जातीजातींमध्ये विष पेरून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात, तेथील अभियंता अवधूत वडर कुटुंबियांची निपक्षः चौकशीची मागणी आम्ही करताच, हे प्रकरण दाबण्यासाठी आणि कुणाला तरी वाचवण्यासाठी त्यांनी जयंत पाटील व माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. जतची जनता त्यांचे खरे रूप आता ओळखू लागली असल्याचा घणाघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रम सावंत यांनी केला.
jat morcha on padalkar : पडळकरांची खालची भाषा महाराष्ट्राला अशांत करणारी : विक्रम सावंत
जतकरांचा संताप उसळला : मविआचा निषेध मोर्चा
यावेळी स्वप्नील शिंदे, रमेश पाटील, सुभाष पाटील, बाबसाहेब कोडग, युवराज निकम, भूपेंद्र कांबळे, वहाब मुल्ला, निलेश बामणे, सिध्दू शिरसाड, जे. के. माळी, शफीक इनामदार, बसवराज बिराजदार, बंटी दुधाळ यांच्यासह मविआचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपने गुरूवारी वडर मृत्यू प्रकरणी काढलेल्या निषेध मोर्चात आ. जयंत पाटील व विक्रम सावंत यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी शहरातील संभाजी महाराज चौकातून जत पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला. यावेळी मविआचे शेकडो पदाधिकारी, जयंत पाटील व बापूप्रेमी नागरीक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी पडळकरांच्या विरोधात जोरदार निषेधाच्या घोषणा देत त्यांचा तातडीने फडणवीस सरकारने राजीनामा घेण्याची मागणी केली.
या मोर्चाला मार्गदर्शन करताना विक्रम सावंत म्हणाले, जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडर यांची आत्महत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले. परंतु त्याची दखल घेतली जात नव्हती, म्हणून याप्रश्नावर आम्ही निषेध मोर्चा काढत चौकशीची मागणी केली. आम्ही कुठल्याही पातळीवर टीका किंवा कुणाचे नाव घेतले नसतानाही भाजप आ. पडळकर व त्यांच्या लोकांनी अतिशय खालची भाषा वापरत टीका केली. या प्रकरणाला त्यांनी जाणीवपूर्वक वेगळे वळण देण्याचे काम केले आहे. मुळात हा प्रकार गंभीर असताना यातून आपली व बगलबच्च्यांची सुटका व्हावी, हाच उददेश असावा असा संशय आणखीन बळावला आहे.
त्यामुळेच आम्ही पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची सखोल आणि स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची पुन्हा मागणी करत आहोत. शिवाय ज्या प्रकारे अशोभनीय आणि समाजिक तेढ निर्माण केली जाणारी वक्तव्ये त्यांनी केली, त्याचा निषेधही आम्ही आजच्या मोर्चाच्या माध्यमातून नोंदवत आहोत. हा मोर्चा एक इशारा असल्याचेच समजवावे, कारण जतला असले वळण यापूर्वी कधीच लागले नाही. जतच्या लोकांसाठी, हितासाठी, विकासासाठी आमच्याकडे सत्ता नसली तरी आम्ही ठाम त्यांच्या पाठीशी राहून लढत राहणार आहोत.
jat-morcha-on-padalkar-padalkars-vulgar-language-is-disturbing-maharashtra-vikram-sawant
जत पंचायत समितीची बदनामी केली
या घटनेनंतर जत पंचायत समितीची पुन्हा बदनामी झाली. मागे रोहयो योजना सुरू असताना येथील सुनील पवार, सरदार पाटील यांनी काय धंदे केले, ही योजना कशी बंद पडली हे सर्वश्रुत आहे. अशाच लोकांना पुन्हा पाठीशी घालण्याचे काम सुरू झाले आहे. वडर प्रकरणात प्रशासन, पंचायत समिती, तपास यंत्रणा यांच्यावर मोठा दबाव आहे. पण या प्रकरणाची पोलखोल झाल्याशिवाय मागे हटणार नाही.
पिठाची चक्की तरी काढली का
लवंगा येथील जमिनी या आम्ही रजिस्टर असणार्या साखर कारखान्याच्या नावानेच खरेदी केल्या आहेत. तो कारखाना लवकरच आम्ही सुरू करून इथल्या लोकांना रोजगार देणार आहोत. डफळापूर येथे श्रीपती शुगर सुरू करून रोजगार दिला. आमच्याकडे विकासाची दिशा आहे, जातीयवादी राजकारण करण्याचे संस्कार नाहीत. या महाशयांनी एमआयडीसीचे गाजर दाखवले पण दहा महीन्यात एक पिठाची चक्की तरी सुरू केली का असा सवाल सावंत यांनी केला.
ब्रेक गाडीला नाही, तोंडालाही नाही : सुजय शिंदे
सभापती सुजयनाना शिंदे म्हणाले, आमदारांच्या गाडीला ब्रेक नाही म्हणून तेच सांगतात, आता तोंडालाही ब्रेक नाही अशी अवस्था झाली आहे. इतक्या खालच्या भाषेत टीका करून त्यांनी जत तालुक्याची, मतदारांची राज्यभर बदनामी केली आहे. स्व. वसंतदादा आणि स्व. राजरामबापू यांची विकासाची स्पर्धा होती. त्यांच्यात मनभेद नव्हते. पण या आमदारांना ज्या कामासाठी निवडून दिले ते सोडून वेगळेच प्रकार येथे सुरू केले असून, याची नोंद जनतेनी घ्यावी.
देशमुख, शेंडगेंचा आदर्श घ्या : खतीब
या राज्यात स्व. गणपतराव देशमुख, स्व. शिवाजीबापू शेंडगें यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली, त्यांचा आदर्श कुठे आणि यांचा आदर्श कुठे याचा विचार करण्याची वेळ आहे. वडर प्रकरणाला वेगळीकडे नेण्यासाठी हीन पातळी गाठणे चुकीचे आहे. आम्ही गप्प आहे, म्हणून कांहीही बरळु नये. हा तालुका गुण्यागोविंदाने नांदतो, इथे जातीयवादी विष कालवू नका.
बुध्दीमत्ता नितीमत्तेचा मेळ नाही : कोकरे
राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे म्हणाले, पडळकरांच्या वक्तव्यानंतर आमच्या समाजातही प्रचंड रोष निर्माण झाला आहे. संस्कार तर यांच्याकडे नाहीतच पण नितीमत्ता, बुध्दीमत्ता याचा कुठे ताळमेळ नाही. जयंत पाटील हे हिमायला इतके मोठे नेते आहेत, त्यांच्यावर टीका करण्याइतपत आपली उंची नाही, हे ध्यानात घ्यावे. ही जनता आता तुम्हाला जागा दाखवेल.
अॅङ चन्नाप्पा होर्तीकर यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत ज्याच्या तोंडावर अजून मिशा आल्या नाहीत, अशी तालुक्यातली कांही लोकं जयंत पाटलांवर बोलतात, त्यांना जनता धडा शिकवेल. महादेव हिंगमिरे म्हणाले, आ. पडळकर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना चिणगी बाबाची पांढरी काय ते लवकरच समजेल. महादेव पाटील यांनी ज्यांच राजकारणच भानगड बाजीचं, खोटेपणाचं आहे, निवडूनही भानगडीतून आले, त्यांना जनता चांगली ओळखून आहे. अण्णासाहेब कोडग म्हणाले, पडळकरांनी आपल्या आईलाच या वक्तव्याचा अर्थ विचारावा म्हणजे आपण काय बोललो याची प्रचिती येईल अशी भावना व्यक्त केली.
पडळकरांचा राजीनामा घ्यावा
या मोर्चात अनेकांनी सुस्कृत समजणार्या भारतीय जनता पार्टीला जर पडळकरांच्या वक्तव्याचे समर्थन करायचे नसेल त्यांनी अगोदर त्यांचा राजीनामा घ्यायला हवा. तसेच या वक्तव्या बददल त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










