kasbe digraj news : कसबे डिग्रजचा अभिमान – जयदीप महेश चौगुले खंब यांचा राज्य कर निरीक्षक पदावर गौरवशाली निवड!: कसबे डिग्रज या मातीतून सतत समाजासाठी कर्तृत्ववंतांची फुले उमलत असतात. त्या परंपरेला पुढे नेत, गावाचे सुपुत्र माननीय श्री जयदीप महेश चौगुले खंब यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षक या प्रतिष्ठित पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. या यशाने केवळ चौगुले परिवाराचाच नव्हे तर संपूर्ण गावाचाही मान उंचावला आहे.
kasbe digraj news : कसबे डिग्रजचा अभिमान – जयदीप महेश चौगुले खंब यांचा राज्य कर निरीक्षक पदावर गौरवशाली निवड!
या उल्लेखनीय यशानिमित्त, कसबे डिग्रज येथील दिगंबर जैन समाज तसेच गावातील मान्यवरांनी एकत्र येऊन जयदीप यांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पाडला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते गावातील मान्यवर समाजभूषण पुरस्कार प्राप्त, माजी चेअरमन व यशस्वी उद्योजक माननीय अण्णासो कुबेर चौगुले यांचे हस्ते सत्कार. त्यांच्याहस्ते मानपत्र, शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जयदीप यांना गौरविण्यात आले.
यावेळी लहान सावकार आर्यन चौगुले यानेही कुटुंबाच्यावतीने हार घालून अभिनंदन केले आणि अभिमानाने जयदीप काकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात महेश जंबू चौगुले यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी या यशामागील परिश्रम आणि कुटुंबाच्या सहकार्याची प्रेरणादायी कहाणी सांगत, गावातील तरुणांना स्पर्धा परीक्षांच्या दिशेने प्रवृत्त केले.
जयदीप यांनी सांगितले की – हे यश माझ्या गावाचे आहे, माझ्या पालकांचे आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येक व्यक्तीचे आहे. पुढेही प्रामाणिकपणे कार्य करत गाव व समाजाचे नाव उज्ज्वल ठेवीन.
हा सोहळा गावातील एक प्रेरणादायी क्षण ठरला. चौगुले कुटुंबाचे हे कर्तृत्व भावी पिढ्यांसाठी आदर्श ठरणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











