jat nagarpalika news : जत नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीने राजकीय रंगत वाढली: जत नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील अकरा प्रभागातील 23 नगरसेवक पदासाठी ही आरक्षण सोडत झाली. या आरक्षण सोडतीने अनेक दिग्गजांना धक्का तर नव्या चेहर्यांना संधी मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
jat nagarpalika news : जत नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीने राजकीय रंगत वाढली
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या जत नगरपरिषद निवडणुकीचा फड आता रंगण्यास सुरुवात झाली आहे. अनेक दिवस गुडग्याला बाशिंग बांधून आपल्या सोयीच्या प्रभागात निवडणुकीची तयारी केली होती. मात्र, आरक्षण जाहीर होताच काहींचा पत्ता कट झाला तर काहींना दिलासा मिळाला आहे. काहींनी आपले मैदान सोडून दुसर्या मैदानात उतरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच नगरपरिषद निवडणुकीचा धमाका फुटणार आहे.
आज प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे अध्यक्षतेखाली या सोडत झाल्या. यावेळी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड व सर्व पक्षांचे पदाधिकारी, नगरपरिषदचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जत नगरपरिषदेच्या एकूण 35 हजार लोकसंख्येनुसार 11 प्रभागांमधून 23 नगरसेवक निवडले जाणार आहेत.
यामध्ये अनुसूचित जातीसाठी 4 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) 6 व सर्वसाधारण प्रवर्गासाठी 12 जागा आरक्षित झाल्या असून यापैकी 12 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दि. 9 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांना हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. यापूर्वीच नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुले झाल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक चुरशीची होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. आता प्रभागातील सदस्य पदांचे आरक्षणही जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्ष अंतिम मोर्चेबांधणीला लागले आहेत.
एकंदरीत या पार्श्वभूमीवर आता जत नगरपरिषद निवडणूक प्रत्येक दिवसागणिक रंगतदार अवस्थेत येणार असून कोण कोणाला शह-काटशह देतो, हे पाहणे आगामी काही दिवसात उत्सुकतेचे ठरणार आहे.
प्रभागनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे….
प्रभाग क्र. 1 :- अनुसूचित जाती व
सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 2 :- सर्वसाधारण ना.मा.प्र. व सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 3:- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्र. 4 :- अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला
प्रभाग 5 :- ना.मा.प्र. महिला व सर्वसाधारण
प्रभाग 6 :- अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्र. 7 :- अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्र. 8 :- ना.मा.प्र. व सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 9 : ना.मा.प्र. महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्र. 10 : ना.मा.प्र. व सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 11 :- अनुसूचित जमाती महिला,
ना.मा.प्र. महिला व सर्वसाधारण
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











