jayant patil news : आ. जयंत पाटलांचा ताकारी भागात संपर्क दौरा

SHARE:

jayant patil news : आ. जयंत पाटलांचा ताकारी भागात संपर्क दौरा: आपण मांडलेल्या विविध प्रश्नांचा, अडी- अडचणींचा निश्चित पाठपुरावा करून आपले प्रश्न टप्प्या-टप्प्याने मार्गी लावू, अशी ग्वाही माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी संपर्क दौर्‍यात बोलताना ग्रामस्थ व कार्यकर्त्यांना दिली. वाळवा तालुक्यातील एकमेव असणार्‍या ताकारी रेल्वे स्टेशनवर विविध रेल्वेगाड्या थांबण्या संदर्भात आपल्या पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार डॉ.अमोल कोल्हे हे रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

jayant patil news : आ. जयंत पाटलांचा ताकारी भागात संपर्क दौरा

अडचणी सोडविण्यासाठी निश्चित पाठपुरावा करण्याचे आश्वासन

आ.जयंतराव पाटील यांनी ताकारी, बनेवाडी,दुधारी,बिचूद,भवानीनगर आदी गावांचा संपर्क दौरा करून ग्रामस्थांशी थेट संवाद करत त्यांचे प्रश्न,अडी-अडचणी समजून घेतल्या. या दौर्‍यात विजयराव पाटील,बाळासाहेब पाटील,संजय पाटील, सुस्मिता जाधव,सुनिता देशमाने,संग्राम जाधव,देवराज देशमुख,वैशाली पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी,अधिकारी सहभागी झाले होते. बनेवाडीच्या नूतन उपसरपंच सुप्रिया संतोष चव्हाण,दुधारीचे नूतन उपसरपंच गोविंद निकम यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

आ.पाटील म्हणाले,ताकारी स्टेशनमध्ये विविध रेल्वेगाड्या थांबण्याचा सर्वांना लाभ आहे. यापूर्वी आपण रेल्वेमंत्र्यांशी पत्र व्यवहार केलेला आहे. मात्र येथे प्रवासी संख्या कमी असल्याचे समजते. आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू. येत्या 15-20 दिवसात संबंधित खात्याचे अधिकारी व शेतकर्‍यांची बैठक घेऊन ताकारी व परिसरातील लाईनिंग,कॅनॉल व रस्त्याचे प्रश्न मार्गी लावूया.

ताकारी,बनेवाडी,दुधारी,बिचूद,भवानी नगर आदी सर्वच गावातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी आ.जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून रस्ते,पाणंद रस्ते,गटारी, कॅनॉल,शाळा इमारत,रेशन आदी विविध प्रश्न मांडले. आ.पाटील यांनी बर्‍याचवेळा संबंधित अधिकार्‍यांना जागेवर जाऊन पाहणी करण्या च्या सूचना केल्या.

या दौर्‍यात विनायकराव पाटील,काकासो यादव,सुनिता देशमाने,देवराज देशमुख,प्रा. डॉ.सुचित्रा यादव,माजी पं.स.सदस्या रुपाली सपाटे,भवानीनगरचे माजी सरपंच बाळासाहेब पाटील,बिचूदचे हरिभाऊ सावंत, प्रदीप गोडसे,प्रकाश पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

jayant-patil-news-a-jayant-patils-contact-visit-to-takari-area

ताकारीचे अर्जुन पाटील,शशिकांत पाटील,दिनकर सावंत,नयना पाटील,कुमार टोमके,कमलाकर भांबुरे,बनेवाडीच्या सरपंच रंजना मोटे,विनायक यादव,दुधारीचे सरपंच नागेश कदम,आनंदराव लकेसर,सागर पाटील,जीवन कदम,बिचूदचे डॉ.सुशिल सावंत,सेवा सोसायटीचे अध्यक्ष सुभाष मोहिते,चंद्रकांत मोहिते,प्रतापसिंह मोहिते, कुलदीप पाटील,भवानीनगरच्या सरपंच इंदुमती ताटे,उपसरपंच जयंत कदम,अशोक गोडसे,दीपक मोहिते,राजेश कांबळे,दीपक घाडगे,सीमा पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी,तसेच स्त्री-पुरुष ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने दौर्‍यात सहभागी झाले होते.

लग्नाचा महत्वाचा प्रश्न सुटेल॥

बिचूद येथे युवक कार्यकर्ते प्रकाश पाटील यांनी युवकांना उद्योग-व्यवसाय आणि नोकरी बद्दल मार्गदर्शन व्हायला हवे,यातून हे युवक आपल्याशी जोडले जातील आणि महत्वाचे म्हणजे त्यांचा लग्नाचा प्रश्न सुटेल,असे सांगताच एकच हास्या झाला. यावर आ. पाटील यांनी समाजात हा प्रश्न गंभीर आहे. आपण गावातील युवकांना एकत्र करा, त्यांच्याशी चर्चा करून काय मार्ग काढता येईल बघू,असा विश्वास व्यक्त केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *