jayant patil news : कुणाची नजर लागली माहित नाही, पण दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला; : 28 जानेवारीला अपघात झाला आणि दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला. कुणाची नजर लागली काही माहित नाही. पण, महाराष्ट्राच्या राजकारणाला नजर लागली आणि दादांसारखा नेता आपल्यातून गेला. महाराष्ट्र राज्यात मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे बघितले जाते, त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची पद्धत आहे का, अशी शंका येत असल्याच्या भावना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केले.
jayant patil news : कुणाची नजर लागली माहित नाही, पण दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला;
दादांच्या आठवणींना उजाळा देताना जयंत पाटील भावूक
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. यावेळी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी जयंत पाटील बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील आणि अजित दादा निघून गेले. आपण दादांसोबत गेल्या 35-40 वर्षांपासून काम केले आहे. दोन दशकं दादा महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यवर्ती भागात होते. दादा काय करणार आणि दादांच्या पक्षाची भूमिका ही गेल्या वीस-पंचवीस वर्षांत महाराष्ट्रात फार महत्वाची ठरली. त्यामुळे जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अनेक दिग्गजांची नावं येतील पण दादांचं नाव लिहिल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही, असे त्यांनी म्हटले.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, दादांचं स्वभाव होता की, जे मनात येईल ते बोलायचे. ॠएका जाहीर सभेत ते आर आर आबांना तंबाखू खाण्याच्या संदर्भात बोलले होते. दादा इतके बोलले की आबांना देखील कदाचित वाईट वाटले असेल. मी आबांच्या घरी जाऊन त्यांना म्हटलो की माझ्या व्यासपीठावरून दादा बोलले, मी माफी मागतो. पण, दादा बोलले ते काही चुकीचे नाही, हे देखील मी हा आबांना बोललो होतो. ज्याचं चुकलंय ते तोंडावर सांगायचं, असा दादांचा स्वभाव होता.
दादा माझ्याकडे आले तर म्हणाले तुम्ही कशी संस्था चालवता? ॠते म्हणाले तुमच्याकडे झाडच नाहीत. ॠबारामतीला या तुम्हाला दाखवतो की कसे झाडं आहेत बघा. ॠमला घर बांधा म्हणून ते वारंवार सांगायचे. ॠदादांची राजकीय समज प्रचंड होती. ॠमी अध्यक्ष झालो त्यावेळी ओहोटीचा काळ होता. ॠत्यावेळी पक्षाच्या अध्यक्षाला सांगून ते निर्णय घेत होते. संघर्ष यात्रा काढली त्यावेळी सर्व व्यवस्था विखे-पाटील यांनी केली होती.
त्यावेळी दादा म्हणाले होते की, हे चांगली व्यवस्था करतात, त्यांनाच आपल्याकडे खेचलं पाहिजे. ॠदादा जर आपल्यात असते तर कधी ना कधी महाराष्ट्राच्या प्रमुख पदावर बसले असते. ॠमधल्या काळात त्यांच्या आणि माझ्या बैठका सात ते आठ वेळा झाल्या. त्यांच्या चेहर्यावर प्रचंड खुशी होते, हे मला नमूद करावंस वाटतंय. तू असशील मोठ्या बापाचा पण मी पण मोठ्या काकांचा आहे, अस ते एका भाषणात म्हणाले होते. यातून त्यांचं पवार साहेब यांच्यावरील प्रेम दिसून आलं, असे देखील जयंत पाटील म्हणाले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











