jayant patil news : जयंत पाटील यांनी केली 100 गणेश मंडळांच्या आरती

SHARE:

jayant patil news : जयंत पाटील यांनी केली 100 गणेश मंडळांच्या आरती : माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी दोन दिवसात उरूण इस्लामपूर शहरातील साधारण 100 च्यावर गणेश मंडळांच्या श्रींच्या आरती करून गेल्या 40 वर्षाचा शहराशी असणारा आपला ऋणानुबंध जपला आहे. गणेश मंडळांच्या व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आ. पाटील यांचे जोरदार स्वागत केले. याप्रसंगी आ.पाटील यांनी उरूण इस्लामपूर शहराच्या  र्थिक,सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक विकासाला पुन्हा गती मिळू दे,असे श्रींच्या चरणी साकडे घातले.

jayant patil news : जयंत पाटील यांनी केली 100 गणेश मंडळांच्या आरती

आ.पाटील यांनी राजारामनगरातील मंडले वस्ती,मोरया,गुरुदत्त मंडळांच्या आरती करून आरती दौरा सुरू केला. यानंतर निनाईनगर, यशोधननगर,सिध्देश्वर,श्रीराम,अष्टविनायक उदय चौक,नरवीर तानाजी,मोरया,शिवराज, आर.डी.पाटील,साई,आदर्श,व्यंकटेश्वरा,उरूण ईश्वरपूरचा महागणपती,संभूअप्पा बुवाफन, झुंजार युवाशक्ती,नागेश युनिव्हर्सल,बिरोबा नगर,सिद्धनाथ,जोगेश्वरी,कै.संग्राम पाटील आदी मंडळांच्या आरती रात्री उशिरापर्यंत केल्या.

तर दुसर्‍या दिवशी उरूणातील सिद्धनाथ,जयंत युवा,अण्णाभाऊ साठे आदी मंडळांच्या आरतींनी सुरुवात केला. राजा छत्रपती,पोपट देसाई,खंडेश्वर,बाल गणेश, शिवराष्ट्र,शिवभक्ती,शिव गर्जना,बाल गणेश, मोरया (महादेवनगर),एकता,न्यू सदाशिव, सेवालाल,राजेबागेश्वर,बाळासाहेब जाधव, गवळी समाज,ओम गणेश,हनुमाननगर,जय हनुमान,अष्टविनायक (मंत्री कॉलनी),श्री साई, नवनाथ,नाथगोसावी गल्ली,एकवचनी,शिव शक्ती (घरकुल),सेवालाल,बुरुड गल्ली,एकता गणेश,कैकाडी गल्ली,जय हनुमान(काळा मारुती चौक),लोकनेते राजारामबापू पाटील, किसाननगर,प्रथमेश (दत्तटेकडी),राजस्फूर्ती शिवनगर,इंदिरा कॉलनी,तिरंगा चौक,सुयोग (टकलाईनगर),विधाता,आबा खवळे (अकबर मोहल्ला),अहिल्यादेवी (शिराळा नाका),सिद्ध नाथ (ब्राम्हणपुरी),भाजी मंडई,लाल चौक, ललकार आदी मंडळांच्या आरती त्यांनी उशिरापर्यंत पूर्ण केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव,सुभाषराव सुर्यवंशी,संदीप पाटील,शंकरराव चव्हाण, सुनिल मलगुंडे,संचालक शैलेश पाटील,युवक शहराध्यक्ष दिग्विजय पाटील,सचिन कोळी, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,माजी नगरसेवक,गणेश मंडळांचे कार्यकर्ते या आरती दौर्‍यात सहभागी झाले होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *