kolhapur zp election news : कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण प्रक्रिया लांबणार : जिल्हा परिषद, पंचायत समितीची बहुप्रतीक्षित असलेली आरक्षण प्रक्रिया किमान 15 सप्टेंबरपर्यंत होणार नसल्याचे स्पष्ट झाले. कारण, मतदारसंघ रचनेबाबतची पुढची सुनावणी 15 सप्टेंबरला होणार असून, तोपर्यंत कोणतीही प्रक्रिया राबविणार नसल्याचे याआधीच सरकारी वकिलांनी स्पष्ट केले आहे.
kolhapur zp election news : कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण प्रक्रिया लांबणार
नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवर हरकती सादर
करवीर, कागल आणि आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाच्या रचनेबाबत येथील सर्किट बेंचसमोर सुनावणी सुरू आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाकडून अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली असून, आता पुढची सुनावणी 15 सप्टेंबरला होईल.
सरकारकडून अॅड. अनिल साखरे आणि राज्य निवडणूक आयोगाकडून अॅड. सचिंद्र शेटे आणि अॅड. अतुल दामले यांनी काम पाहिले. याआधीच्या सुनावणीमध्ये जोपर्यंत या याचिकेला निकाल लागणार नाही, तोपर्यंत या निवडणुकीची कोणतीही पुढची प्रक्रिया करणार नसल्याची हमी सरकारी वकिलांनी दिली होती. त्यामुळे आता आरक्षण प्रक्रिया सप्टेंबर महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यापर्यंत पुढे गेल्याचे मानले जाते.
नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवर हरकती सादर
जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 92 हरकती दाखल झाल्या आहेत. त्या हरकतींवर दि. 8 सप्टेंबरपर्यंत सुनावणी घेऊन प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे सादर केल्या जाणार आहेत. त्यांच्या मान्यतेनंतर मुख्याधिकारी अंतिम प्रभाग रचना जाहीर करतील. जिल्ह्यातील दहा नगरपालिकांपैकी आठ नगरपालिकांतील प्रभाग रचनांवर 67 हरकती आल्या आहेत.
प्रांताधिकारी यांच्याकडे या हरकतींवर सुनावणी सुरू असून त्यानंतर 9 ते 11 तारखेदरम्यान प्रभाग रचना नगरविकास विभागाला सादर केली जाईल. विभागाकडून ती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाईल. आयोगाच्या मान्यतेने मुख्याधिकारी 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर करतील.
नगरपालिकांसाठी आलेल्या हरकती
मलकापूर : 21
हुपरी : 16
शिरोळ : 10
जयसिंगपूर :7
पन्हाळा : 6
कागल आणि वडगाव : प्रत्येकी 3,
गडहिंग्लज : 1
नगरपंचायतींसाठी आलेल्या हरकती
हातकणंगले : 19
चंदगड : 4
आजरा : 2
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











