jayant patil news : जयंतराव पाटील यांना देश पातळीवरील लाईफ टाईम आचिव्हमेंट अवार्ड

SHARE:

jayant patil news : जयंतराव पाटील यांना देश पातळीवरील लाईफ टाईम आचिव्हमेंट अवार्ड : राज्याच्या सहकार क्षेत्रात गेल्या 40 वर्षा पासून मोलाचे योगदान केल्याबद्दल राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांना देश पातळीवरील लाईफ टाईम आचिव्हमेंट अवार्डया पुरस्काराने,तर अल्पावधीत सहकारी साखर कारखानदारीत आपला वेगळा ठसा उमटविल्याबद्दल राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांना देश पातळीवरील इंडस्ट्री एक्सलन्स अवार्ड या पुरस्काराने दिल्ली येथील शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

jayant patil news : जयंतराव पाटील यांना देश पातळीवरील लाईफ टाईम आचिव्हमेंट अवार्ड

दि.शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते, असोसिएशनचे अध्यक्ष संजय आवस्थी यांच्या सह देशातील साखर उद्योगातील मान्यवरांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला.

आ.जयंतराव पाटील यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या अकाली निधना नंतर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत कारखान्याचा विस्तार केला,एकाच्या चार शाखा केल्या. त्यांनी देशाच्या सहकार क्षेत्रातील पहिला शाखा वाटेगाव येथे सुरू केली. त्यांनी वयाच्या 21-22 व्या वर्षी गावोगवी पदयात्रा काढून वाळवा तालुक्याच्या शिवारात पाणी आणले आहे. त्यांनी राज्य साखर संघ,राज्य शासन आणि साखर उद्योगातील शिखर संस्था व्हीएसआयच्या माध्यमातून राज्यातील सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान केलेले आहे. ते सध्या कृत्रिम बुद्धीमत्ता कृती समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

प्रतिकदादा पाटील यांनी अगदी अल्पावधी काळात साखर उद्योगात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांनी शेतकर्‍यांशी थेट संवाद साधत साखर कारखान्याच्या प्रगतीस गती दिली आहे. त्यांनी देशात सर्वप्रथम आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आधुनिक ड्रोन उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी शेकर्‍यांच्या हिताच्या विविध योजना सुरू केल्या असून ते अद्यावत तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोचविण्या साठी प्रयत्नशील आहेत.

आमच्या नेत्यांना देश पातळीवर सन्मानित केल्याचा आम्हास सार्थ अभिमान असून आमच्या राजारामबापू साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे,अशी भावना राजारामबापू साखर कारखाना परिसरात व्यक्त करण्यात आली. कारखान्याचे सभासद शेतकरी,संचालक,अधिकारी व कर्मचार्‍यांनी कारखाना परिसरात आनंदोत्सव साजरा केला.

jayant-patil-news-jayantrao-patil-receives-national-level-lifetime-achievement-award

फोटो ओळी- दिल्ली येथे दि.शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते देश पातळीवरील लाईफ टाईम आचिव्हमेंट अवार्ड हा पुरस्कार स्विकारताना माजी मंत्री आ.जयंतराव पाटील. समवेत असोसिएशनचे अध्यक्ष संजय आवस्थी व मान्यवर.

दिल्ली येथे दि.शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते देश पातळीवरील इंडस्ट्री एक्सलन्स अवार्ड हा पुरस्कार स्विकारताना राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील. समवेत असोसिएशनचे अध्यक्ष संजय आवस्थी व मान्यवर

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *