raju shetti on rahesh shirsagar : शेट्टींच्या बक्षीसपत्रासमोर क्षीरसागरांचा राजकीय पलायनवाद: राजकारणात आरोप करणं सोपं असतं, पण त्या आरोपांना सामोरे जाण्याचं धाडस फार थोड्यांमध्ये असतं. हेच शनिवारी कोल्हापुरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात पुन्हा एकदा सिद्ध झालं.राजकीय लावालावीच्या रणात, माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील संघर्षाने चांगलंच पेट घेतलं आहे. पण या संघर्षात एकजण बिनधास्त उभा राहतोय, तर दुसरा केवळ आरोप करून पलायन करत असल्याचं दृश्य जनतेने स्वतः पाहिलं!
raju shetti on rahesh shirsagar : शेट्टींच्या बक्षीसपत्रासमोर क्षीरसागरांचा राजकीय पलायनवाद
“बोलबच्चन आमदार, तर मैदानात उतरलेला ‘शेतकऱ्यांचा बुलंद आवाज’”
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांच्यावर 500 एकर जमिन खरेदी केल्याचा गंभीर आरोप केला.
शेट्टींच्या राजकीय जीवनातील पारदर्शकता पाहता हा आरोप म्हणजे काचेमध्ये दगड मारण्याचा प्रयत्न होता.
पण शेट्टी कोण?
तो असा नेता आहे जो जनतेच्या वर्गणीतून निवडणुका लढवतो, आंदोलकांच्या खांद्यावरून संसदेत पोहोचतो, आणि कुठल्याही बिल्डर, उद्योजकाच्या ‘हप्त्यावर’ अवलंबून राहत नाही.
“राजकारणात नाही तर आभाळात उडालाय का? क्षीरसागर कुठे गायब झाले?”
राजू शेट्टी यांनी खुलं आव्हान दिलं –
“जर माझ्याकडे 500 एकर जमीन आहे हे सिद्ध करू शकलात, तर ती जमीन मी तुमच्या नावावर बक्षीसपत्र करून देतो!”
आणि या आव्हानाचं पालन करत ते शनिवारी दुपारी 12 वाजता कोल्हापुरातील बिंदू चौकात उपस्थित राहिले.
पावसाची तमा न बाळगता शेट्टी समर्थकांसह 2 तास बसले. वकील आणले. जमीन बक्षीस देण्यासाठी प्रत्यक्ष बक्षीसपत्रावर सह्या केल्या.
पण दुसरीकडे क्षीरसागर कुठेच दिसले नाहीत.
संपूर्ण शहराने बघितलं – आरोप करणारे आमदार पळून गेले!
“हक्काचं उत्तर मागितलं, पण बेभान राजकारणात मौन ठेवणं सोयीचं वाटलं!”
राजू शेट्टी म्हणाले –
“मी फॉर्च्युनर गाडीसाठी आयआरबीकडे हात नाही पसरला. मी कोणत्याही डॉक्टरांकडून किंवा बिल्डरांकडून बगलबच्चे पाठवून पैसे घेतले नाहीत. मी कोणत्याही महापालिकेच्या आरक्षणात घोटाळा करून प्लॉट बळकावले नाहीत.
माझ्या संपत्तीची चौकशी करायची असेल, तर करा. मी स्वतःच तयार आहे!”
हे शब्द म्हणजे केवळ भाषण नव्हते, ते एक जबाबदार, निर्भीड आणि पारदर्शक राजकीय संस्कृतीचे प्रतीक होते.
“शब्द टाकून पळालात क्षीरसागर… जनतेला साक्षी ठेवून सिद्धतेचं आव्हान देणाऱ्या शेट्टींचा विजय!”
राजू शेट्टी यांच्यावर टीका करणे सोपे आहे. पण जेव्हा त्यांनी मोकळ्या मैदानात आव्हान उभं केलं, तेव्हा आमदार क्षीरसागर गायबच झाले.
त्यांनी 500 एकरचा आरोप करून स्वतःच्या राजकीय साखळीचा गळफास बनवून घेतला.
raju-shetti-on-rahesh-shirsagar-kshirsagars-political-escapism-in-front-of-shettys-award-certificate
शेट्टी यांनी कोणतीही सरकारी खुर्ची, सत्तेचा माज किंवा उद्योगपतींचे पाठबळ न घेता आजवर लढा दिला आहे.
त्यांची प्रतिमा आजही जनतेत “शेतकऱ्यांचा आवाज, आंदोलनाचा मावळा” म्हणून आहे.
या प्रकरणातून एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली –
“राजकीय आरोपांची फेक लावता येते, पण तिला सत्याच्या दिव्यात पार करून सिद्ध करणं हे फक्त राजू शेट्टींसारख्यांच्याच रक्तात असतं!”
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










