jayant patil news : मतदानाचा संविधानीक अधिकारच गायब होतोय : जयंत पाटील

SHARE:

jayant patil news : मतदानाचा संविधानीक अधिकारच गायब होतोय : जयंत पाटील : हा देश संविधानाने एकत्र बांधला आहे. संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकारच केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी गायब करत आहेत अशी टिका माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी आज केली. डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित ख्रिश्चन मुस्लीम अधिकार परिषदेत ते बोलत होते. सुकुमार कांबळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर अजिंक्य चांदणे, गॅब्रिएल तिवडे, संजय बजाज, शेवंता वाघमारे यांची प्रमुख उपस्थित होती.

jayant patil news : मतदानाचा संविधानीक अधिकारच गायब होतोय : जयंत पाटील

ख्रिश्चन मुस्लीम अधिकार परिषदेत केंद्र सरकारवर टिका

आमदार पाटील म्हणाले,‘‘ या देशाची विविधता हीच ओळख आहे. या वैविध्यपूर्ण समाजाला बांधण्याची संविधानाने जबाबदारी पार पाडली. आपण सर्व एकत्र आहोत. राजे रजवाड्यांचे राज्य संपवून इथे संविधानाने प्रत्येकाला मताचा अधिकार दिला. एका कलमाने उच्चनिच्चता संपवली. सर्वांना समान पातळीवर आणले. हीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला देणगी आहे.

तत्कालीन नेत्यांनी विविधता हीच शक्ती मानली आणि सर्व समाजाला एकत्र आणले. मात्र विद्यमान सत्ताधारी द्वेषाचे राजकारण करीत आहेत. या देशात अवघ्या काही वर्षापुर्वी शिख पंतप्रधान आणि मुस्लीम राष्ट्रपती असताना कधीही हिंदू धोक्यात नव्हता मात्र ही मंडळी सत्तेत आल्यानंतर मात्र रोज हिंदूंना धोका असल्याचा गजर सुरु आहे. पण हे ते विसरतात की या देशातील बहुसंख्य हिंदू समाजाने संविधान मान्य करून या देशाची वाटचाल निश्चित केली आहे.

इथले जैन, मुस्लिम, ख्रिश्चन असे सारेच अल्पसंख्य समाज या देशाचे अविभाज्य भाग आहेत हे इथल्या बहुसंख्य हिंदू समाजाने शतकानुशतके मनाने स्वीकारले आहे. हे भान ठेवून राजकारण केले पाहिजे. एखाद्या अल्पसंख्याक समाजाचा द्वेष करण्यापेक्षा विकासावर बोला. त्यांच्या प्रगतीवर चर्चा करा. ते करीत नाहीत कारण ते जनतेच्या मतावर निवडून आलेले नाहीत. मतांची चोरी करून ते सत्तेवर बसले आहेत हे आता देशभरातील सत्तर टक्के जनताच म्हणत आहे. त्यांनी संविधानाने दिलेला मताधिकारच चोरला आहे.’’

…हा माझा प्रॉब्लेम
सातत्याने राजकीय लक्ष्य करणार्‍या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आज जयंत पाटील यांनी शेलक्या शब्दात टिका केली. ते म्हणाले,‘‘
मंगळसूत्राच्या नादी मी लागत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे. अशा वाचाळविरांवर त्यांच्या वरीष्ठांनी बोलावे. मताची चोरी करून जिंकलेल्यांनी मला आव्हान देण्यापेक्षा त्यांनी स्वतःच राजीनामा देऊन त्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. आता मी बोललोय तेवढ्यावर पुढचा महिना निघेल.’’

………………..
परिषदेतील ठराव

ख्रिश्चन-मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्या
जिल्ह्याच्या ठिकाणी शंभर विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभे करा
अल्पसंख्याक आयोगावर अल्पसंख्यांकाना सदस्य नियुक्त करा
गोवंश कायदा रद्द करा, शहनिशा करूनच गुन्हे दाखल करा.
कत्तलखानाचालक-व्यापार्‍यांना पोलिस संरक्षण द्या
प्रत्येक गावात दफनभूमी,मशिद, चर्चसाठी जागा द्या.
अल्पसंख्यांकावरील हल्ल्यातील गुन्हेगारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा.
धर्मगुरुंवर द्वेषापोटी दाखल गुन्हे मागे घ्या.
धर्मप्रसाराचा संविधानीक अधिकार मान्य करा.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *