jayant patil news : ज्यांचं मन दुसरीकडे आहे, त्यांनी आत्ताच निरोप घ्यावा; गद्दारी चालणार नाही! – आ. जयंत पाटील 

SHARE:

jayant patil news : ज्यांचं मन दुसरीकडे आहे, त्यांनी आत्ताच निरोप घ्यावा; गद्दारी चालणार नाही! – आ. जयंत पाटील : महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषदांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचालींचं वादळ उठायला सुरुवात झाली आहे. पक्षातील काहीजण सत्ताधार्‍यांच्या वार्‍यावर उडू पाहत असताना, नेते आ. जयंत पाटील यांनी ठाम भूमिका घेत ज्यांना जायचं आहे त्यांनी आत्ताच जावं; निवडणुकीच्या ऐनवेळी गेला तर मी कार्यक्रम करूनच टाकीन! असा सज्जड इशारा दिला आहे.

jayant patil news : ज्यांचं मन दुसरीकडे आहे, त्यांनी आत्ताच निरोप घ्यावा; गद्दारी चालणार नाही! – आ. जयंत पाटील 

सांगलीतल्या जिल्हा कार्यालयात घेण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत, आ. पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की, जनतेच्या मनात सत्ताधार्‍यांविषयी नाराजी आहे. लोकशाहीचं चाक आता आपल्या दिशेने फिरू लागलंय. पुढच्या निवडणुका आपल्यासाठी संधी ठरणार आहेत. त्या ताकदीने लढायच्या आहेत, आणि त्यात यश नक्कीच मिळणार.

पण त्याचबरोबर त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना इशारा दिला, ज्यांना दुसर्‍या पक्षात जायचं असेल, त्यांनी आता निर्णय घ्यावा. निवडणुकीच्या तोंडावर गळाफास घालून नाटकं करण्याचा प्रयत्न कुणी केला, तर मी आता मोकळा आहे… मग ’कार्यक्रम’ करायलाच लागेल!

jayant-patil-news-those-whose-minds-are-elsewhere-should-say-goodbye-now-betrayal-will-not-work-a-jayant-patil

या बैठकीला शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शेखर माने, युवक अध्यक्ष राहुल पवार, महिला आघाडीच्या संगीता हारगे, माजी नगरसेवक हरिदास पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांमध्ये एकच चर्चा – जयंतदादांचा इशारा म्हणजे फक्त इशारा नाही, तर पक्षशिस्तीचा ध्वज फडकवण्याचा इरादा!

राजकारणात वार्‍याची दिशा कुठेही वळो, पण जयंत पाटलांनी पक्षात फितुरीचं थैमान रोखण्याची भूमिका अत्यंत ठामपणे घेतली आहे. आता बघायचं एवढंच की, कुणी ऐनवेळी जातं का, आणि गेलं तर त्या ’कार्यक्रमाची’ रूपरेषा काय असते!

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *