jayant patil news : राजारामबापू पाटील कारखान्यात 1 लाखाव्या पोत्याचे पूजन : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिटमध्ये उत्पादित 1 लाख 101 व्या साखर पोत्याचे पूजन राजारामबापू समूहाचे मार्गदर्शक,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील,माजी जि.प. अध्यक्ष देवराज पाटील,शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील,जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी जेष्ठ संचालक बाळासाहेब पवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
jayant patil news : राजारामबापू पाटील कारखान्यात 1 लाखाव्या पोत्याचे पूजन
आ.जयंतराव पाटील म्हणाले,गेल्या वर्षीच्या तुलनेत हा गळीत हंगाम लवकर सुरू झाला असून पूर्ण क्षमतेने गाळप सुरू आहे. आपण सर्वांनी ऊस तोडणी कार्यक्रमाच्या बाबत कायम दक्ष रहायला हवे. आपण वाफ बचत प्रकल्प हाती घेत असून तो पुढील हंगामच्यापुर्वी पूर्ण करू.
उपाध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले, ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला नोंदविलेला सर्व ऊस आपल्या कारखान्यास देऊन सहकार्य करावे.
आर.डी.माहुली म्हणाले,आपण 17 दिवसात 1 लाखाच्यावर साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. या गळीत हंगामात 120 दिवसात 8 लाखाच्यावर गाळप करून 12.75 टक्क्यावर साखर उतारा राखण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यावेळी प्रदीपकुमार पाटील, रघुनाथ जाधव,प्रताप पाटील,राजकुमार कांबळे, रामराव पाटील, डॉ.योजना शिंदे-पाटील, दिलीपराव देसाई,माजी संचालक माणिकराव पाटील,कृष्णेचे संचालक अविनाश खरात, पै.विकास पाटील,ए.पी.पाटील यांच्या हस्ते ही साखर पोत्याचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी संचालक दादासाहेब मोरे,अतुल पाटील,बबनराव थोटे,दीपक पाटील, दिलीपराव देसाई,अमरसिंह साळुंखे,वैभव रकटे,हणमंत माळी,सचिव डी.एम.पाटील, जनरल मॅनेंजर एस.डी.कोरडे,विजयराव मोरे,चिफ केमिस्ट सुनिल सावंत,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील,कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण,कामगार प्रतिनिधी विकास पवार,मनोहर सन्मुख,शिवाजी पाटील,बजरंग आंबी यांच्यासह संचालक,ऊस उत्पादक सभासद,अधिकारी-कामगार उपस्थित होते.
प्रारंभी शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील यांनी आभार मानले. आयएसओ विभागाचे निलेश साठे यांनी सूत्रसंचालन केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











